Chana Production Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Production : हरभरा उत्पादनात यंदा घट

Chickpea Production : बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातही यंदा हरभरा पिकातून शेतकऱ्यांना फारसा लाभ झालेला नाही. हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

Team Agrowon

Latur News : बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातही यंदा हरभरा पिकातून शेतकऱ्यांना फारसा लाभ झालेला नाही. हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. एकरी दोन क्विंटल ९१ किलो हरभऱ्याचे उत्पादन आल्याचे कृषी विभागाच्या पीक कापणी अहवालातून समोर आले आहे.

रब्बी हंगामातील हरभरा हे महत्त्वाचे अन् हक्काचे पीक. तालुक्यातील मांजरा नदीकाठचा भाग हा हरित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हा भाग तालुक्याचे हरभऱ्याचे आगार बनलेला आहे. पेरणीपासून काढणीपर्यंतची सुलभ प्रक्रिया, मर्यादित खर्च, बाजारभाव साडेपाच हजार अन् त्यापेक्षा पुढे, जमिनीची प्रत सुधारण्यास मदत करणारे पीक असल्याने रब्बी हंगामात हरभरा पिकास शेतकरी प्राधान्य देतात.

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हरभऱ्याचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, पेरणीनंतर सतत धुके, सातत्याने थंड हवामानाचा अभाव, रोगट हवामान व मर रोगाचा झालेला मोठा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी हरभरा या महत्त्वाच्या पिकाचे उत्पादन घटले आहे. कृषी विभागाने तालुक्यातील देवणी, वलांडी व बोरोळ या तीनही महसूल मंडळांत १८ ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले.

यात प्रत्येक क्षेत्रात १० मीटर रुंद व १० मीटर लांब क्षेत्रावरील हरभऱ्याची काढणी करून त्याची रास करण्यात आली. यात सात किलो २८५ ग्रॅमचा उतारा आला. एकरी दोन क्विंटल ९१ किलो उत्पादन निघाले आहे.

सोयाबीनपाठोपाठ हरभऱ्याकडूनही निराशा

खरीप हंगामातील सोयाबीन या महत्त्वाच्या पिकातील उत्पादनात घट अन् चार हजार रुपयांपेक्षा कमीचा दर यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा रब्बी हंगामातील हरभरा पिकावर होत्या. समाधानकारक पाऊस झाल्याने अधिक उत्पादनाची स्थिती असताना रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. दोन्ही हंगामातील प्रमुख पिकांनीच शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT