Agriculture Land Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land Dispute : दावा कूळ हक्काचा!

शेखर गायकवाड

शेखर गायकवाड

Story of Agriculture Land Dispute : एका गावात सुधाकर नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याचा व्यापार मुख्यतः शहरात असल्यामुळे तो शहरात राहायला गेला. त्याची गावात थोडीफार शेतजमीन पण होती. सुधाकरने रोजंदारीवर गावातील एका माणसाला मुकादम म्हणून नेमला होता. त्या मुकादमाला सुधाकरने मासिक पगार देण्याचे ठरविले.

मुकादमाला सुद्धा काही काम नव्हते, म्हणून त्याने पण जमीन कसण्यास होकार दिला. सुधाकरने नेमलेला मुकादम काही वर्षे चांगल्या प्रकारे शेतीत काम करून मालकाला चांगले उत्पन्न मिळवून देत होता. कालांतराने सुधाकरने नेमलेल्या मुकादमाचे शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. त्यामुळे शेतीतून उत्पादन फार कमी यायला लागले होते.

मुकादमची त्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती. एक दिवस शेजारच्या शेतकऱ्याने मुकादमाला फूस लावली, की तू पीक पाहणीला लावण्यासाठी अर्ज दे, आणि दावा मिळकतीत कूळहक्काची मागणी कर.

शेजारच्या शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार मुकादमाने एक दिवस स्वतःचे नाव पीक पाहणीला लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज दिला. एवढेच नाही तर दावा मिळकतीत कूळ हक्काची मागणी सुद्धा केली. काही दिवसांनंतर तहसीलदार चौकशीसाठी सुधाकरच्या शेतीची पाहणी करायला आले.

पण मुकादमाने त्या अगोदरच शेजारच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्या बाजूने तहसीलदारांना जबाब देण्यासाठी पटवून ठेवले होते. ‘कसणाऱ्याची जमीन’ हे तत्त्व वापरून मुकादमाने अर्ज केला होता. काही वर्षे ‘मुकादम’ हा नोकरदार असून मी त्याला पगार देतो हे सुधाकरचे म्हणणे मान्य झाले.

मात्र शेवटच्या दोन वर्षांचा काहीच पुरावा मालकाकडे नव्हता. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे मजुरीने शेतात काम करणाऱ्या माणसाने कूळ हक्काचा दावा करून पीकपाहणी बाबत अर्ज करणे, हे आजकालच्या काळात अशक्य नाही.

पोटहिश्शाची मोजणी

एका गावात गणपत नावाचा एक म्हातारा शेतकरी राहत होता. गणपतला दोन मुले होती. एकाचे नाव हरीश व दुसऱ्या मुलाचे नाव मनीष होते. गणपतने आपल्या दोन मुलांना गट नं. ४२ ही शेतजमीन वाटप करून दिली. वाटपाप्रमाणे दोघेही आपापल्या हिश्शाची जमीन कसू लागले.

जमिनीचे वाटप झाल्यानंतर तलाठ्याने त्याच्या दोन हिश्शांना गट नं. ४२/१ व ४२/२ अशी नावे दिली व सातबारा वेगळे केले. काही वर्षांनंतर हरीश व मनीषच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावंडांत भांडणे होऊ लागली. त्यामुळे हरीशने स्वतःच्या गट नंबर ४२/१ या जमिनीची मोजणी करण्याचे ठरविले.

त्याप्रमाणे हरीशने भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी करण्याबाबतचा अर्ज दिला. जमीन मोजणी कार्यालयाने हरीशच्या अर्जानुसार पाहणी केली असता मोजणी खात्याकडे गट नं. ४२/१ या जमिनीचा मोजणी नकाशा नसल्याचे आढळून आले.

मोजणी खात्यातील अधिकाऱ्याने हरीशला सांगितले, की तू प्रथम पोट हिश्शाची मोजणी करून घे. त्यासाठी पोटहिस्सा गट नंबरचे विभाजन केवळ सातबारावर होऊन चालत नाही. पोटहिश्शाची मोजणी होण्यासाठी मोजणी फी वेगळी भरा. अशी माहिती मोजणी अधिकाऱ्याने हरीशला सांगितली, तरी त्याला हे काही समजत नव्हते.

आपला सातबारा वेगळा असताना मला त्रास देण्यासाठी मोजणी खाते मोजणी करायला सांगत असल्याचा त्याचा समज होता. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे पोटहिश्शाची मोजणी झाल्याशिवाय मूळ गटाच्या तुकड्यांची मोजणी करता येत नाही. कारण आपसांत वाटण्या केल्या, तरी जमिनीचे मोजमापे व रेकॉर्ड हे मूळ गटाप्रमाणेच सरकार दरबारी असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT