Water Testing  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Quality : पाणी नमुने तपासणीवर नागरिकांचा भर

Water Sample Testing : गेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल सहा लाख ४८ हजार १५२ पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आहे.

Team Agrowon

Pune News : पिण्याच्या पाण्यामधील सूक्ष्म व आरोग्यास अपायकारक असलेल्या घटकांची माहिती होण्यासाठी नागरिक पाणी तपासणीवर भर देत आहे. गेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल सहा लाख ४८ हजार १५२ पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची गुणवत्ता समजण्यास मदत झाली आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांमार्फत असलेल्या प्रयोगशाळांमधून शंभर टक्के सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने पृथक्करण करणे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देश समोर ठेवला आहे.

त्यानुसार पाणी नमुन्याची तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या राज्यात १८३ प्रयोगशाळा मंजूर आहेत. त्यापैकी सहा विभागीय, २८ जिल्हा व १४४ उपविभागीय अशा एकूण १७८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक स्रोतांतील नमुन्याची तपासणी केली जाते. ही तपासणी मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनोतत्तर अशी दोनवेळा जैविक व रासायनिक तपासणी केली जाते.

गेल्यावर्षी २०२२-२०२३ मध्ये सात लाख १९४ नमुन्यांची तपासणी केली होती. यामध्ये दोन लाख ८८ हजार ७९४ रासायनिक, तर चार लाख ११ हजार ४०० अनुजैविक नमुन्याची तपासणी केली होती. पाणी नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर तपासणी केलेल्या अहवालांची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली जाते. जेणेकरून राज्यातील प्रत्येक गावातील पाणी गुणवत्तेची परिस्थिती सर्व सामान्य नागरिकांना अवगत होईल.

प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण करून बाधित आढळलेल्या नमुन्यांचा अहवाल तत्काळ संबंधित ग्रामपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना चोवीस तासांच्या आत कळविला जातो.

त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्यामार्फत उपाययोजना करण्यात येतात. रासायनिक व जैविक घटकांचे पृथक्करण केले जाते. त्यामुळे पाणी गुणवत्तेबाबत माहिती वेळेत प्राप्त होऊन बाधित गुणवत्तेमुळे होणाऱ्या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य होते.

चालू आर्थिक वर्षात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे दाखल झालेल्या एकूण नमुन्यांपैकी दोन लाख २९ हजार २३८ रासायनिक नमुन्याची तपासणी केली आहे. तर चार लाख १८ हजार ९१४ अनुजैविक नमुन्याची तपासणी केली आहे. रासायनिक घटकांमध्ये कलर, पीएच, कंन्डक्टीवीटी, विरघळलेले क्षार, आयर्न, क्लोराईड, फ्लोराईड, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, नायट्रेट, सल्फेट, अल्कानिटी, तर अनुजैविकमध्ये ई कॉलिफॉर्म व टोटल कॉलिफॉर्म असे विविध घटक तपासले जातात. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार निश्चित केलेल्या दरानुसार रक्कम आकारली जाते, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या पाच वर्षांत तपासलेले पाणी नमुने संख्या

वर्ष --- नमुने संख्या

२०१६-१७ -- ६,४१,८४१

२०१७-१८ -- ६,४९,३६९

२०१८-१९ -- ७,३८,७२७

२०१९-२० -- ७,४४,२०१

२०२०-२१ -- ६,९५,२३७

२०२१-२२ -- ५,९६,३९२

२०२२-२३ -- ७,००,१९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT