Onion Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Variety : योग्य कांदा जातींची निवड

Onion Market : राज्यात खरीप, रांगडा आणि रब्बी अशा तिन्ही हंगामांत कांदा लागवड होते. हंगामनिहाय लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच कांदा-लसूण संशोधन संचनालय, राजगुरुनगर, जि. पुणे यांच्याकडून कांद्याच्या विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत.

डॉ. आदिनाथ ताकटे 

महत्त्वाच्या बाबी

दर्जेदार आणि भरघोस कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, खात्रीशीर बियाणे तसेच रोपवाटिका व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

लागवडीसाठी कीड- रोगांना प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.

मानेची जाडी, पक्वता कालावधी आणि रंग इत्यादी निकष लक्षात घ्यावेत.

बियाणे खरेदी करताना शुद्ध, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले आणि चालू वर्षाचे असल्याची खात्री करावी.

कांदा बियाण्याची उगवणशक्ती केवळ एक वर्ष राहते. त्यामुळे लागवडीसाठी ताजे बियाणे घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा कांदा पिकात डेंगळे कांदे येतात आणि अनेक शेतकरी त्याचेच बी धरून लावतात. अशा बियाण्यामुळे उत्पादन कमी येते प्रतही खालावते. केवळ चांगल्या प्रतीच्या कांद्याची निवड करून तयार केलेले बियाणे वापरावे.

शासनाने अधिकृत केलेल्या बियाणे विक्री केंद्रातून किंवा कृषी विद्यापीठातून बियाणे खरेदी करावे.

हंगामनिहाय जातीची निवड करून त्या जातीचेच बियाणे खरेदी करावे.

अर्का कल्याण

कांदे गोलाकार, रंगाला गर्दलाल आणि चवीने तिखट.

१०० ते ११० दिवसांत काढणीस येतात.

सरासरी उत्पादन : हेक्टरी २५ ते ३० टन

ॲग्री फाउंड लाइट रेड

नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी संस्थेद्वारे विकसित.

कांदे गोल, मध्यम ते मोठे व फिक्कट लाल

चव तिखट, विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण १३ टक्के.

डेंगळ्याचे प्रमाण कमी

साठवणुकीस योग्य.

लागवडीपासून १२५ ते १३० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन ः हेक्टरी ३० ते ३५ टन.

अर्का निकेतन

भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था, बंगलोर यांच्याद्वारे विकसित.

कांदे गोलाकार, रंगाने गुलाबी, बारीक मानेचे, चवीला तिखट.

साठवण क्षमता : ५ ते ६ महिने

सरासरी उत्पादन : हेक्टरी २५ ते ३० टन.

- डॉ. आदिनाथ ताकटे : ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT