Cotton Variety  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Variety : योग्य कापूस जातींची निवड

Cotton Cultivation : कापसाचे उत्पादन हे जमिनीचा प्रकार, जातीची निवड, लागवड पद्धत, पाण्याची उपलब्धता, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन तसेच कीड-रोग नियंत्रण अशा घटकांवर अवलंबून असते.

Team Agrowon

डॉ. भाऊसाहेब पवार, डॉ. पवन कुलवाल, डॉ. नानासाहेब मरकड

कापसाचे उत्पादन हे जमिनीचा प्रकार, जातीची निवड, लागवड पद्धत, पाण्याची उपलब्धता, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन तसेच कीड-रोग नियंत्रण अशा घटकांवर अवलंबून असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य जातींची निवड. सदोष जात किंवा चुकीच्या ठिकाणी किंवा अयोग्य जात निवडल्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.

जमिनीचा प्रकार (उथळ/खोल), ओलिताची उपलब्धता आणि लागवड पद्धती यांचा विचार करूनच जात निवडावी.

कीड, रोगांना सहनशील जात निवडावी.

बोंडे चांगली फुटणारी, वेचणीस सोपी व धाग्याची प्रत चांगली असावी.

हलकी, मध्यम जमीन (कोरडवाहू शेती)

हलकी, मध्यम जमीन, कमी आर्द्रता धरून ठेवते. त्यामुळे पिकावर ताण लवकर येतो. अशा परिस्थितीत लवकर परिपक्व तयार होणाऱ्या जाती निवडाव्यात. (१४० ते १५० दिवस).

लवकर तयार होणाऱ्या जातीमध्ये बोंड लवकर तयार होतात, त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा धोका कमी असतो, उत्पादन लवकर येते, बाजारात चांगला दर मिळतो.

पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असणाऱ्या जातींना प्राधान्य

द्यावे.

भारी, खोल जमीन (बागायती शेती)

ही जमीन आर्द्रता टिकवून ठेवते, पीक दीर्घकाळ टिकते. अशा ठिकाणी मध्यम ते उशिरा येणाऱ्या जाती योग्य ठरतात (१८० ते २०० दिवस).

मध्यम-मोठ्या आकाराचे बोंड

असलेली अधिक उत्पादनक्षम जात निवडावी.

उशिरा येणाऱ्या जातीची लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनावर लक्ष द्यावे.

बियाणे खरेदी करताना

बियाणे परवाना असलेल्या दुकानातून पक्क्या पावतीसह घ्यावे.

पावती, पॅकेट जतन करून ठेवावे. गरज पडल्यास पुरावा म्हणून उपयोग होतो.

सध्या बाजारात अनेक संकरित बी.टी. जाती उपलब्ध आहेत. त्यामुळे एखाद्या जातीचे बियाणे उपलब्ध नसल्यास विशिष्ट जातीचा आग्रह न करता त्याचा पर्याय म्हणून इतर योग्य जातीची निवड करावी.

भारत सरकारने फक्त बीजी-१ आणि बीजी-२ बियाणे लागवडीला परवानगी दिली आहे. एचटीबीटी,बीजी-३, बीजी-४ या नावाने विकले जाणारे बोगस बियाणे टाळावे. असे बियाणे विकणे आणि त्यांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे.

सघन लागवडीसाठी जातीची निवड

आटोपशीर ठेवण असणाऱ्या जाती निवडाव्यात. गळ फांद्यांचे प्रमाण कमी असावे किंवा गळ फांदी नसावी.फांद्याची लांबी व झाडाची उंची कमी असावी.

कमी कालावधी, एकाच वेळी बोंडे परिपक्व होणारी जात असावी.

सर्वसाधारणपणे उशिरा येणाऱ्या जाती उंच वाढतात. त्यांच्या फळ फांद्या, गळ फांद्यांची लांबी जास्त असते. अशा जातींची निवड सघन लागवडीसाठी करू नये.

जगभरामध्ये सघन लागवडीसाठी सुधारित बीटी जातींची लागवड केली जाते. भारतामध्ये सुधारित बीटी जातींना सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने सघन लागवडीसाठी संकरित बीटी जातींची लागवड करतात.

- डॉ भाऊसाहेब पवार,

७५८८६०४०९०

(कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

Yeola Water Scarcity: येवल्यात टंचाईची झळ तीव्र; ५५ टँकर फेऱ्यांवर पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT