Chitale Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Chitale Dairy : जातिवंत पशुपैदाशीचे तंत्रज्ञान पोहोचविणारी चितळे डेअरी

Breeding Technology : पशुधन आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास हे ध्येय ठेवून मे. बी. जी. चितळे डेअरी कार्यरत आहे.

Team Agrowon

Sangli News : पशुधन आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास हे ध्येय ठेवून मे. बी. जी. चितळे डेअरी कार्यरत आहे. डेअरीच्या पशुसंवर्धन व विस्तार विभागाकडून पशुपालकांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

यामध्ये दूध तपासणी प्रयोगशाळा, कॉल सेंटर, रक्त तपासणी केंद्र, क्ष-किरण सुविधा केंद्र यांचा समावेश आहे. युवा शेतकरी आणि महिलांसाठी मुरघास निर्मितीसह विविध प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते.

जातिवंत गायी- म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत डेअरीतर्फे मार्गदर्शन केले जाते. जातिवंत दुधाळ गायी, म्हशींच्या पैदासीसाठी कृत्रिम रेतन तसेच लिंग वर्गीकृत रेतमात्रा या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ जनावरांची पैदास होऊन दूध उत्पादनात आश्‍वासक वाढ मिळू शकते,

हे लक्षात घेता त्यांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना जागृत केले जात आहे. शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन डेअरीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सातत्याने केले जाते. त्याचा चांगला फायदा पशुपालकांना होत आहे.

वर्षभर सकस चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिकांच्या लागवडीसह मूरघास निर्मितीबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले जाते. लहान पशुपालकांसाठी मुरघास निर्मितीच्या सायलेज बॅग डेअरीतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

डेअरीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध दुग्धजन्य पदार्थ तसेच खाद्य पदार्थांची निर्मिती केली आहे. याला ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT