Education Agrowon
ॲग्रो विशेष

Education : वीटभट्टीवरील मुले शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रीक टू इंक ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-शहापूर भागांत सुरू असलेल्या वीटभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात महिला, पुरुषांसह बालकेदेखील मजुरीचे काम करत असतात.

या बालकांना मोलमजुरीच्या कामाऐवजी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे.

डोअर स्टेप स्कूल फाऊंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील १०७ वीटभट्टीवरील सर्व्हेक्षण करण्यात आले. तेथे ० ते १६ वयोगटातील एक हजार १२ बालके आढळून आली आहेत.

या बालकांना त्यांच्या वयोमानानुसार अंगणवाडी आणि शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहापूर तालुक्यासह भिवंडी तालुक्यालादेखील भेट दिली.

शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांना त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान १ ते १६ वयोगटातील बालके त्या ठिकाणी असल्याचे आढळून आले. या वेळी त्यांनी या बालकांना वीटभट्टीवर काम न करू देता, त्यांना शिक्षण घेण्याकडे वळविणे गरजेचे असल्याचे नमूद करीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

सातत्य टिकवणे गरजेचे..

ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रीक टू इंक ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे कुटुंबाचे समुपदेशन करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात मुलांना आणण्यात येत आहे.

असे असले तरी शहापूर तालुक्यातील सापगाव येथील वीट्टभट्टी व शाळा हे अंतर लांब असल्याने व रस्ता ओलांडून मुलांना शाळेत जावे लागत असल्यामुळे अनेकदा पालक शाळेत मुलांना पाठविण्यासाठी घाबरत आहेत.

त्यामुळे या वीट्टभट्टीवरील बालकांचे शिक्षणातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी येथील शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शहापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जी बालके आढळून आली आहेत, त्या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आहाराची काळजी घेतली जात आहे. तसेच डोअर स्टेप स्कूल फाउंडेशन आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या बालकांना प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे. तसेच पुढील वर्षी वीटभट्टीवर मजुरीसाठी येणाऱ्या मजुरांच्या बालकांच्या शिक्षणाचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT