Beed News : वीट उद्योगासाठी ‘क्लस्टर’ उभारणार : धनंजय मुंडे

परळी नगरपरिषदेला जेवढा निधी खर्च होत आहे, तेवढाच सिरसाळा गावासाठी अधिक निधी देणार आहे.
Beed News
Beed NewsAgrowon

Beed News : परळी नगरपरिषदेला जेवढा निधी खर्च होत आहे, तेवढाच सिरसाळा गावासाठी अधिक निधी देणार आहे.

येथील प्रसिद्ध अशा वीट उद्योगासाठी क्लस्टर (Brik Industry Cluster) योजना उभारणी करून देशातील नंबर एकचा वीट उद्योग करणार असल्याचे आश्वासन माजी समाजकल्याण मंत्री आ. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले.

सिरसाळा गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन माजी समाजकल्याण मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २४) करण्यात आले. त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.

Beed News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे अपघातात जखमी

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ,संचालक सूर्यभान मुंडे,माजी सरपंच वैजनाथ देशमुख, सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, राम किरवले, इम्रान पठाण, चेअरमन संतोष पांडे, उपसरपंच सोहेल पठाण, अक्रम पठाण, फिरोज पठाण, चंद्रकांत कराड, देवराव काळे, संचालक राजाभाऊ पौळ, प्रशांत देशमुख, सतीश काळे, बाळू किरवले, रफिक बागवान, शेख नदीम, रघुनाथ देशमुख उपस्थिती होती.

श्री मुंडे म्हणाले, की सिरसाळा हे गाव झपाट्याने वाढत आहे. २०५४ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण बंधाराच्या (बरेज)माध्यमातून सुमारे २१ कोटी ५० लाख रुपये खर्च करून दर्जेदार काम करून सिरसाळरांना हे पाणी मिळणार, असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com