Chief Minister Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Chief Minister Eknath Shinde : छापेमारी प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे संतापले अन् सत्तारांनी जोडले हात

Agriculture Minister Abdul Sattar : मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व मंत्रीमंडळासमोर खडसावल्याची माहिती मिळाली आहे.

Team Agrowon

Eknath Shinde Abdul Sattar : मागच्या चार दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या छापेमारीवरून अब्दूल सत्तारांवर नामुष्कीची वेळ आली आहे. अकोल्यात कृषी विभागाकडून बोगस बियाण्यांप्रकरणी छापेमारी करण्यात आली.

दरम्यान यावरून अब्दूल सत्तारांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. याचबरोबर धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच खडसावल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व मंत्रीमंडळासमोर खडसावल्याची माहिती मिळाली आहे.

अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून, यापुढे अशा घटना होऊ नयेत अशी समज देखील सत्तार यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे जास्तच संतापल्याने सत्तारांनी हात जोडल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मागच्या चार दिवसांपूर्वी अकोला जिल्हा कृषी विभागाकडून बोगस बियाणे विक्री प्रकरणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यादरम्यान धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत काही खाजगी लोक असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

दरम्यान हा सर्व प्रकार एका वृत्तवाहिनीने समोर आणला होता. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनल्याने या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतल्याने मंत्रीमंडळ बैठकीत सत्तार लक्ष ठरले होते.

झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अकोल्यातील छापेमारीवेळी पथकात खाजगी लोकांचा समावेश कसा होता? असा सवाल सत्तार यांना विचारण्यात आला. तसेच यापुढील सर्व कारवाया कायदेशीर पद्धतीने झाल्या पाहिजेत. अशा घटनांनी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हणत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

मंत्रीमंडळ बैठकीवेळी विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अकोला येथे बोगस बियाणे प्रकरणी टाकण्यात आलेल्या छापेमारी विषयावर देखील चर्चा झाली. याविषयाची सुरूवात देवेंद्र फडणवीस यांनी करत यावर नाराजी व्यक्त केली. तर हा सर्व प्रकार गंभीर विषय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी

यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. तुम्ही कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नाही. तर तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना झापले, असल्याची माहिती देण्यात आली होती.

अकोल्यातील कृषी विभागाने धाड टाकली यादरम्यान पथकाने पाच लाखांची खंडणी मागितली असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सत्तार यांना खडसावले असल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT