Chana Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Harvesting : हरभरा काढणीच्या कामाला आला वेग

Chana Cultivation : यंदा हंगामात पाऊस सरासरी एवढा झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. आता हरभरा, ज्वारी काढणीला आला आहे.

Team Agrowon

Vasmat News : यंदा हंगामात पाऊस सरासरी एवढा झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. आता हरभरा, ज्वारी काढणीला आला आहे. मात्र, अवकाळीच्या धास्तीने शेतकरी चिंतेत असून दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

अवकाळीच्या तडाख्यात अडकण्याआधी हरभरा काढणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिल्याचे दिसत आहे. यंदा खरिपामध्ये उशिरा झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन नंतर हरभऱ्याची लागवड केली होती.

त्यामुळे यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्र समाधानकारक असून मात्र अवकाळीचा धोका कायम असल्याने हरभरा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच हरभरा सोंगणीला जोर आला असून दरवर्षी फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिण्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याची हजेरी लागते. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याचबरोबर अनेक रब्बी पिकांची काढणी सुरू झाल्याने मजूरही मिळेनासे झाले आहेत.

दरम्यान, हंगामात सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांची सर्वाधिक पेरणी होते. तर रब्बी हंगामात हरभरा या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर दिला. ही पारंपरिक पिके मात्र दरवर्षीच नैसर्गिक संकटांच्या तडाख्यात सापडून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

यंदाही तशीच स्थिती उद्‌भवली असून सध्या कडक ऊन तापले असल्याने ही अवकाळी पूर्वीची स्थिती असल्याचे ज्येष्ठ शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी पिके काढून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

ज्वारीसारखी अवस्था

गव्हाचा खर्च आणि मशागत जास्त पण भाव कमी असल्याने हरभऱ्याकडे शेतकरी वळले आहे. शेतशिवारातील बहुतांश हरभरा वाळला असून काढणीला वेग आला आहे. परंतु, मजुर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मजुरांअभावी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पिके घेणे कमी केले आहे. आता हरभरा पिकाला देखील मजूर मिळत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT