Chia Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Chia Seeds : निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर चिया सीड्स

Health Benefits : चिया सीड्समध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे चिया सीड्स या हृदयासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध विकारांवर उपयोगी ठरतात.

Team Agrowon

कृष्णा काळे, डॉ. चिन्मय चोरगे

Chia Farming : चिया सीड्स या बियांना मेक्सिकन चिया या नावाने देखील ओळखले जाते. या बियांचे शास्त्रीय नाव सॅल्विया हिस्पॅनिका असे आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मानवी आहारामध्ये यांचा वापर वाढतो आहे.

चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मँगेनीज, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय ओमेगा-३ फॅटी ॲसिड, तंतुमय पदार्थ, प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे चिया सीड्सचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते.

चियाच्या सीड्स या गडद काळ्या, राखाडी रंगाच्या असतात. आकाराने लहान आणि अंडाकृती असतात. या बिया आकाराने लहान असल्या तरी त्यांचे फायदे अनेक आहेत. विविध बेकरी उत्पादने, आइस्क्रीम, ज्यूस इत्यादी अन्नपदार्थांचा दर्जा वाढविण्यासाठी चिया सीड्सचा वापर केला जातो. त्यामुळे या अन्नपदार्थांतील पोषक घटकांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.

चिया सीड्समध्ये ॲन्टिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते.

चिया सीड्समधील अल्फा लिनोलेनिक आम्लामुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

चियाच्या सीड्समध्ये हृदयविकारासह अनेक हृदयासंबंधीत आजारांचा धोका कमी करू शकतो. चिया सीड्समध्ये फायबरदेखील जास्त असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

चिया सीड्समध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यात मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

बऱ्याच लोकांना सतत छातीमध्ये जळजळ झाल्यासारखे वाटते. अशा लोकांसाठी चिया बिया अत्यंत गुणकारी ठरतात.

चिया सीड्स हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचनक्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरते.

वजन नियंत्रित राखण्यातही चिया सीड्स फायदेशीर ठरतात.

हाडांचे आरोग्य राखण्यासाठी देखील मदत करतात. सीड्स मध्ये हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे पोषक घटक जसे की कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस हे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते.

पोषक घटकांचे प्रमाण

कॅलरी ः १३८ ग्रॅम

प्रथिने ः ४.७ ग्रॅम

फॅट ः ८.७ ग्रॅम

कर्बोदके ः १२ ग्रॅम

तंतुमय पदार्थ ः ८ ग्रॅम

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT