Agriculture Irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : चणकापूर, पुनंद धरणांतून आवर्तन सोडले

Crop Irrigation : चणकापूर-पुनंद धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले आहे. सिंचन व पिण्यासाठीचे हे संयुक्त आवर्तन असल्याने विविध पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Nashik News : चणकापूर-पुनंद धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले आहे. सिंचन व पिण्यासाठीचे हे संयुक्त आवर्तन असल्याने विविध पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दोन्ही धरणांतील पाणी येथील गिरणा पुलापर्यंत आले आहे. याचा फायदा नदीकाठावरील चिंचावड, आघार खुर्द, आघार बुद्रुक, दाभाडी, पाटणे, टेहरे, मुंगसे, चंदनपुरी आदी गावांना होणार आहे.

धरणांमधून सोडलेले पाणी चंदनपुरीपर्यंत आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यासह कसमादेत उन्हाचा तडाखा वाढला आहे. पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला होता. चणकापूर, पुनंद या दोन्ही धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले.

चणकापूर धरणातील आवर्तनाचा फायदा लाभ क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व शेतीला झाला. गिरणा काठावरील विविध गावांकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत होती. ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून आवर्तनाचे पाणी चंदनपुरीपर्यंत सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न किमान दीड ते दोन महिन्यांसाठी तरी सुटला आहे.

तालुक्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक भागांतील जलसाठे व विहिरींचे पाणी कमी होत आहे. धरणातील आवर्तनाचा फायदा कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांतील विविध पाणीपुरवठा योजना व शेतीलाही होत आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जात आहे. चणकापूरचे आवर्तन २२ फेब्रुवारीला सोडण्यात आले होते. ते १९ मार्चला बंद झाले. जवळपास २६ दिवस आवर्तन सुरू होते. आवर्तनचा फायदा रब्बी पिकांसह उन्हाळी कांदा व फळबागांना झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT