
Solapur News : मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीपिकासाठी सलग दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. त्यापैकी पहिले आवर्तन आजपासूनच (गुरुवार) सुरु करण्यात आले. त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास ५०० क्युसेक इतके पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आले.
उन्हाची तीव्रता रोज वाढताना दिसून येत आहे, त्यातच रब्बी पिके आता अंतिम टप्प्यात आहेत. अनेक भागात गहू, ज्वारीची काढणी सुरु आहे. काही भागात डाळिंब, द्राक्ष, कलिंगड खरबूज यासारखी पिके आहेत. यापैकी सर्व पिकांना पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. उजनी धरणातही सध्या एकूण पाणीसाठा ८९.५४ टीएममसी एवढा आहे.
पण त्यापैकी उपयुक्त साठा २५.८८ टीएमसी एवढाच आहे. तर या पाण्याची टक्केवारी ४८.३१ आहे. शिवाय धरणाच्या पाणी धोरणानुसार २० टक्के पाणीसाठा राहिल्यास, कालव्यातून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे हे पाणी लवकरात लवकर सोडावे, अशी मागणी होती. त्यानुसार मुंबईतील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार रब्बी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे. या दोन आवर्तनानुसार उजनी धरणातून आता कालव्यात पहिले आवर्तन ६ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत ८.५० टीएमसी, तर दुसरे आवर्तन १५ एप्रिल ते २५ मे पर्यंत सोडण्यात येईल, त्यात ७.५० टीएमसी इतके पाणी सोडण्यात येणार आहे.
तर भीमा-सीना जोडकालव्यातून पहिले आवर्तन ६ मार्चपासून ४ एप्रिल कालावधीत २.२० टीएमसीचे तर भीमा-सीनामधील दुसरे आवर्तन ५ ते एप्रिल ते ३ मे कालावधीत २ टीएमसीचे तर थेट भीमा नदीतून पहिले आवर्तन ६ ते २० एप्रिल दरम्यान सुटेल आणि भीमा नदीतून दुसरे आवर्तन २६ ते ७ जून दरम्यान सुटेल, त्यात ४.५० टीएमसी एवढे पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.