Poultry Business Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Business : विदर्भासाठी पोल्ट्री व्यवसाय धोरणात बदल करा

Poultry Farming : कमी दरात व्यापाऱ्यांना पुरवठा होतो. याचा फटका वैयक्‍तिक स्तरावर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुक्‍कुट व्यावसायिकांना होतो याच धोरणात बदल करावा, अशी मागणी होत आहे.

Team Agrowon

Amravati News : करारदार कंपन्यांद्वारा कुक्‍कुटपक्ष्यांचा प्रती किलो दर दुपारी निश्‍चित झाल्यानंतर सायंकाळी मागणी नसल्याचे सांगत कमी दरात व्यापाऱ्यांना पुरवठा होतो. याचा फटका वैयक्‍तिकस्तरावर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुक्‍कुटव्यवसायिकांना होत असल्याने किमान विदर्भासाठी या धोरणात बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा फेडरेशनच्या वतीने अतुल पेरसपुरे, शुभम महाले यांच्या नेतृत्वात व्यंकटेश्‍वर इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका अनुराधा देसाई यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, विदर्भातील बहुतांश जिल्‍ह्यात शेतीमधून अपेक्षित उत्पादकता आणि उत्पन्न होत नसल्याने त्यापार्श्‍वभूमीवर या भागात शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. अमरावती, नागपूर जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात रुजला आहे. करारदार कंपन्यांद्वारे रोज दुपारी दीड वाजता मोबाइल कॉन्फरन्सच्या माध्यमातून दर निश्‍चित केला जातो.

या कॉन्फरन्समध्ये शेतकरी प्रतिनिधींचा देखील समावेश असतो. हा दर निश्‍चित झाल्यानंतर त्यानुसार ओपन पोल्ट्री व्यवसाय करणारे कुक्‍कुटपालक व्यापाऱ्यांशी पक्षी विक्रीचा व्यवहार करतात. त्याचवेळी सायंकाळी कंपन्यांद्वारे व्यापाऱ्यांना कमी दरात कुक्‍कुटपक्षी विक्री होते. मागणी नसल्याचे कारण कंपन्या त्यामागे देतात. परिणमी सर्वदूर बाजार गडगडतो आणि कमी क्षमतेत पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.

हे धोरण अन्यायकारक असल्याने यावर तोडगा निघावा याकरिता पशुपालकांकरिता बैठकीचे आयोजन कंपनीस्तरावर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संदीप गोळे, सतीष गवई, अमित कांबे, संजय गायकवाड, उमेश बिजवे, नईम सौदागर, रजत गावंडे, भरत ठाकरे, अनुराग धानोकर, इद्रीस सैफी, अनिल अग्रवाल, आकाश खुरद, बाळा सांगोले, विजय पुंड, दिपक अढाऊ, अभय बोंडे, गिरीश घटोळे, विशाल ताजे, बळवंत कांबे, पदमाकर देशमुख यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT