Rain Update Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता, हवामान खात्याची नवी अपडेट

sandeep Shirguppe

Maharashtra Rain Update : राज्यात आज (ता.०९) जानेवारी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात मागच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा, काजूचे उत्पन्न खराब होऊ शकते. आजही राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने सोमवारी (ता. ८) राजस्थान मधील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी ओसरली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आज (ता. ९) राज्याच्या किमान तापमानात वाढ टिकून राहण्याची शक्यता आहे.

तामिळनाडून पावसाचा हाहाकार

तमिळनाडूत अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, राज्यातील कुड्डलोर, विल्लुपुरम, मायिलाडुथुराई, नागापट्टण, रानिपेट, वेल्लोर, तिरूवन्नमलाई, तिरूवरूर, कल्लाकुरिची आणि चेंगालपट्टू आदी जिल्ह्यांत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. अण्णामलाई विद्यापीठानेही पावसामुळे सुटी जाहीर केली. विद्यापीठाच्या परिपत्रकात म्हटले आहे, की पावसामुळे विद्यापीठाच्या तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाच्या सोमवारच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

परीक्षेची नवीन तारीख नंतर घोषित करण्यात येईल. तमिळनाडूप्रमाणेच पुदुच्चेरीतही मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. नुकतेच डिसेंबरमध्ये दक्षिण तमिळनाडूतील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता.

तमिळनाडूत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

तमिळनाडूत अनेक ठिकाणी पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यातील तिरूवरूर, नागापट्टण, कुड्डुलोर आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुदुच्चेरी व कराईकल भागात एक- दोन ठिकाणीही पावसाचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT