Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : सांगलीत पावसाची उघडीप; कोल्हापूर जिल्ह्यात हुलकावणी

Rain Update : सांगली जिल्ह्यात गेले आठ ते नऊ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात गेले आठ ते नऊ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत २.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका पाऊस पडला.

जिल्ह्यात गेल्या तेरा दिवसांपासून पाऊस पडत आहे. दुष्काळी भागासह कृष्णा आणि वारणा काठच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात १३ दिवसांपैकी सरासरी आठ ते नऊ दिवस पाऊस झाला असून १६० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. सायंकाळच्या दरम्यान चांगली शहरासह मिरज तालुक्यात मध्यम पाऊस झाला. तर गुरुवारी (ता. १३) सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. बुधवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामातील पिकांच्या टोकनीचे नियोजन करू लागला असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होण्यापूर्वीच बियाण्यांची खरेदी केली होती. सध्या ज्या भागामध्ये वाफसा आला आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांची टोकणी सुरू केली आहे.

सांगली जिल्ह्यात चोवीस तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

तालुका पाऊस

मिरज ६.२

जत ०.२

खानापूर-विटा ४.२

वाळवा ०.५

तासगाव ३.२

आटपाडी ०.०

कवठे महांकाळ ०.४

पलूस ०.२

कडेगाव ४.१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmers Relief : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये ग्वाही

Maharashtra Drought Situation: राज्यात दुष्काळ जाहीर करा: शरद पवार

Sugarcane Viral Diseases: उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रसार

Blight Management: टोमॅटोवरील करपा, फळसड रोगाचे नियंत्रण

Rabi 2026 Sowing : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचे १ हजार ७७७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट; पावसाच्या तुटीमुळे चिंता वाढली

SCROLL FOR NEXT