Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

Rain Forecast : खानदेशापर्यंत मॉन्सून पोहचल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली असून काही भागात अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे.

Team Agrowon

Pune News : खानदेशापर्यंत मॉन्सून पोहचल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली असून काही भागात अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे. पुणे जिल्ह्यातही मावळ, बारामती, इंदापूरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ९३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर भागांत पावसाचा जोर अधिक होता. तर पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा कमी अधिक होता. हवेली तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस पडला.

शिरूरमधील मलठण मंडलात ३५.३ मिमी, तर तळेगाव १९, रांजणगाव १०.३ मिमी पाऊस पडला. तर टाकळी, वडगाव, न्हावरा, कोरेगाव, पाबळ, शिरूर भागांत तुरळक सरी पडल्या. बारामतीतील बारामती शहरात २४.८ मिलिमीटर, माळेगाव २९.०, पणदरे १३.८, वडगाव, लोणी १५.८, सुपा १०.५, मोरगाव २२.५, इंदापुरातील भिगवण १६.८, इंदापूर ७७, लोणी ३३.३, बावडा २२.५, काटी २०.५, निमगाव ३३.८, अंथुर्णे १७.८, सणसर २४.८ मिलिमीटर पाऊस पडला. मावळातील काले मंडलात ३५.५ मिलिमीटर, कार्ला ४१, खडकाळा २२.८ मिलिमीटर पाऊस पडला असून वडगाव मावळ, तळेगाव, शिवणे भागात हलक्या सरी कोसळल्या.

जुन्नरमधील राजूर २५, डिंगोरे २५, आपटाळे ११.८ मिलिमीटर तर ओतूर, जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. खेडमधील कुडे १७.० मिलिमीटर तर पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, वाडा, राजगुरुनगर येथे अधूनमधून सरी बरसल्या. आंबेगावमध्ये १३.३ मिलिमीटर, तर कळंब, पारगाव, मंचर भागात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात काही अंशी ढगाळ वातावरणासह अधूनमधून तुरळक पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT