Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हंगाम आव्हानात्मक

Sugarcane Crushing : नैसर्गिक बदलांमुळे तसेच शेती, साखर कारखानदारीबाबतच्या आडमुठ्या धोरणांमुळे गळीत हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे.

Team Agrowon

Sangli News : नैसर्गिक बदलांमुळे तसेच शेती, साखर कारखानदारीबाबतच्या आडमुठ्या धोरणांमुळे गळीत हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. सर्वांच्या साथीने या आव्हानाला सामोरे जाऊया, असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी केले.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या गाळप हंगामाच्या प्रारंभी आमदार लाड बोलत होते. अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड प्रमुख उपस्थित होते.

क्रांतिअग्रणी बापू व विजयाकाकू लाड यांच्‍या प्रतिमेचे पूजन झाले. ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते काटा पूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम प्रारंभ झाला.

लाड म्हणाले, की देणी वेळेत दिल्याने अल्पावधीत कारखाना सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. शासनाने उसावरील राज्य बंदी उठवल्यामुळे खासगी कारखाने ऊस तोडीसाठी महाराष्ट्रात येतील.

अडचणीत मदत करणाऱ्या कारखान्यांना ऊस गाळपासाठी पाठवा. उसाला अजूनही दर देणे शक्य आहे. पण शासकीय स्तरावर साखरेची किंमत ३१०० वरून ३८०० रुपये करणे गरजेचे आहे. यावर्षी १४ लाख टन ऊस उपलब्ध आहे. १० लाख टन गाळपाचे उद्दिष्‍ट आहे.

अध्यक्ष शरद लाड म्हणाले, की १६०-१८० दिवस हंगाम होणे गरजेचे असताना यंदा १२० दिवसच होईल. या वेळी आजी-माजी संचालक, सभासद, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT