Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जतमध्ये पाणीटंचाईच्या झळा

Sangli Water Crisis : अंकलगी येथे पाण्याची टाकी, पाणीपुरवठ्याचा मुख्य उगम व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. पाण्याच्या नियमित व स्वच्छ पुरवठ्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदा टंचाईत वाढ झाली असताना जत तालुक्याला टंचाईच्या झळा अधिक सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट देत पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा व विकासकामांचा आढावा घेतला.

जत तालुक्यातील टंचाई दौऱ्यात सीईओ धोडमिसे यांच्यासमवेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, गटविकास अधिकारी माडगूळकर, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

अंकलगी येथे पाण्याची टाकी, पाणीपुरवठ्याचा मुख्य उगम व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. पाण्याच्या नियमित व स्वच्छ पुरवठ्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. आरोग्य उपकेंद्र, अंकलगी येथे भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवा, औषधसाठा, महिला व बाल आरोग्याबाबत उपलब्ध सुविधा यांची पाहणी केली.

अंकलगी व कोत्येंबोबलाद येथे सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी टँकरची तपासणी करून पाण्याच्या नमुन्यांची जागीच चाचणी घेण्यात आली. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळत आहे, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये वेळेवर व नियमित टँकर सेवा उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. गावात मंजूर टँकर फेरी होत आहेत का, याबाबतची खात्री करण्यात आली. महिला बचत गटांच्या सदस्यांसमवेत संवाद साधण्यात आला.

तिकोंडी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. घरकुलांचे दर्जा, कामाची गती, लाभार्थ्यांना मिळणारी सुविधा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तिकोंडी तलाव परिसरात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या पाणीपुरवठा विहिरींची पाहणी करून गुणवत्तेबाबत व विहिरीच्या पाण्याच्या साठ्याबाबत सूचना देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT