Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scam: महाराष्ट्रातील पीकविमा भ्रष्टाचाराची चौकशी करणार; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे संसदेत आश्‍वासन

Agriculture Minister Shivraj Chauhan: राज्यातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. ४) लोकसभेत दिले.

गणेश कोरे

New Delhi News: राज्यातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. ४) लोकसभेत दिले.

महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याप्रश्‍नी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या वेळी बोलताना सुळे म्हणाल्या, ‘‘गेल्या अडीच वर्षांत आपल्या पक्षाचे सरकार असताना, पीकविमा योजनेत ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे कृषिमंत्र्यांनी मान्य केले आहे.

तर हा भ्रष्टाचार केवळ ५०० कोटी रुपयांचा नसून, आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा ५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप केला आहे. यामुळे या घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी.’’

लोकसभेत मंगळवारी (ता. ४) झालेल्या या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घोटाळ्याची चौकशी केली जाईल. तसेच घोटाळा सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मी सभागृहाच्या वतीने देतो असे आश्‍वासन दिले.

दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये परभणी जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टरवर परळीतील व्यक्तींनी बोगस पीकविमा काढून मोठा घोटाळा केला आहे. २०२३-२४ मध्ये हा प्रकार घडला असून याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केला होता. या प्रकरणाचा दाखला खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT