Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यावर केंद्राने काढला मार्ग

Ajit Pawar : प्रधानमंत्री पीकविम्याबाबत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मार्ग काढला असून, त्याबाबत दिल्लीत चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलविले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत दिली.

Team Agrowon

Mumbai News : प्रधानमंत्री पीकविम्याबाबत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मार्ग काढला असून, त्याबाबत दिल्लीत चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलविले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत दिली.

वानखेडे स्टेडिअममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पवार यांनी विविध लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांसदर्भात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ‘महाराष्ट्रवादी हेल्पलाइन’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

अजित पवार म्हणाले, की बीड येथे बुधवारी (ता.२१) कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांना भेटलो. या वेळी मी कांदा निर्यातबंदीचा मुद्दा उपस्थित केला. ‘आम्ही कांदा निर्यात बंदी कधीच करणार नाही असे आम्ही महाराष्ट्राला सांगत आहोत. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे.’ असेही पवार म्हणाले.

सोयाबीन, कापूस आणि सोयाबीन या पिकांबाबतही आम्ही काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. प्रधानमंत्री पीकविम्याबाबत आम्ही मार्ग काढण्याची विनंती केली. त्यांनी त्यावर मार्ग काढला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि राज्यातील केंद्रीय मंत्री एकत्र बसून या विषयावर अंतिम मार्ग काढणार आहोत.

अजित पवार पुढे म्हणाले, की महाराष्ट्रातील जनतेसाठी आम्ही विविध योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाइन हे कॉल सेंटर सुरू करणार आहोत. दररोज ५० हजार चौकशी करणारे कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आमचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचतील असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT