Cotton Arrival Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Arrival : सीसीआयचे खरेदी केंद्र, खासगी जिनिंगमध्ये कापूस आवक कमीच

Cotton Market : ‘सीसीआय’च्या केंद्रावर कमाल दर ७०२०; खासगीत ६९२५ रुपये

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
CCI Cotton जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘सीसीआय’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रात तसेच शहर परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमीच असल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे खासगी जिनिंगमध्ये कापूसदरही कमी मिळत असल्याची स्थिती आहे.

यंदा जालना जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचे प्रदीर्घ खंड व त्यानंतर अखेरच्या टप्प्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसाचे दर पडले तसेच चांगल्या कापसालाही आधी मिळत असलेल्या दराच्या तुलनेत कमीच दर मिळायला लागले. उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येते आहे. त्याचा थेट परिणाम विक्रीसाठी येणाऱ्या कापसाची आवक घटण्यावर होताना दिसतो आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘सीसीआय’च्या वतीने ११ डिसेंबरपासून कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर बुधवारी (ता. २७) ४८५ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली होती.

त्याआधी ११ ते २६ डिसेंबर या कालावधीत या केंद्रावर २८२४ क्विंटल ७० किलो आवक झाली होती. त्यामुळे या केंद्रावर एकूण आवक ३३१० क्विंटल १० किलो राहिली.

दुसरीकडे जालना शहर परिसरातील खासगी जिनिंगकडे १ एप्रिल ते २७ डिसेंबर या कालावधीत एकूण ५५४६ क्विंटल ११ किलो कापसाची आवक झाली. त्यामध्ये बुधवारी (ता. २७) आवक झालेल्या १२२ क्विंटल ४४ किलो व त्याआधी आवक झालेल्या ५४२३ क्विंटल ६७ किलो कापसाचा समावेश आहे.

खासगी जिनिंगमध्ये आवक झालेल्या कापसाला ५९६० ते ६९२५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. दुसरीकडे ‘सीसीआय’च्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे दर ६७३९ ते ७०२० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT