Cashew Season Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Season : काजूचा हंगामदेखील तीन टप्प्यांत

Cashew Market :बदललेल्या वातावरणाचा परिणाम; अजूनही येतेय पालवी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Cashew : सिंधुदुर्गनगरी ः हापूसप्रमाणे या वर्षी काजूचा हंगामदेखील तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदललेल्या वातावरणाचा हा परिणाम मानला जात आहे.
जिल्ह्यात या वर्षी हापूसचा हंगाम तीन टप्प्यांत येण्याचा अंदाज आहे. बदललेल्या वातावरणाचे हे परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या वातावरणाचा काजू हंगामावर देखील परिणाम झाला आहे.

जानेवारीच्या अखेरीपासून सुरू होणाऱ्या काजू हंगामाची अजूनही चाहूल दिसत नाही. ऑक्टोबर महिन्यात पालवी आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये काजूला मोहर फुटण्यास प्रारंभ होतो. परंतु थंडीअभावी या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३० टक्के झाडांना पालवी मोहर आला. त्यानंतर डिसेंबरमध्ये काही झाडांना पुन्हा पालवी आणि मोहर आला. मात्र हे प्रमाणदेखील अल्प होते.

मात्र अलीकडे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आता झाडांना तिसऱ्या टप्प्यात पालवी आणि मोहर फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला आलेल्या मोहराच्या काजू बी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, डिसेंबरमध्ये पालवी आलेल्या झाडांना फेब्रुवारी अखेरीपर्यंत किवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात तर जानेवारीत मोहर आलेल्या झाडांवरील काजू बी एप्रिल महिन्यात परिपक्व होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्षीचा काजू हंगाम देखील तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी मोहर आलेल्या झाडांना पुन्हा आता पालवी फुटल्यामुळे काजू बागायतदार काहीसे हतबल आहेत. काजू बीचा आकार कमी होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

Farm Machinery Repair: प्रशिक्षण जमीन विकसन यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे

PM Kisan 23rd Installment: पीएम किसानचा २३ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT