Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Crop : काजूला पालवी फुटेना

Cashew : लांबलेल्या पावसामुळे अजूनही काजू कलमांना पालवी फुटलेली नाही. त्यामुळे यावर्षीचा काजू हंगाम लांबण्याची चिन्हे दिसून येत नाही.

एकनाथ पवार

Sindhudurg News : लांबलेल्या पावसामुळे अजूनही काजू कलमांना पालवी फुटलेली नाही. त्यामुळे यावर्षीचा काजू हंगाम लांबण्याची चिन्हे दिसून येत नाही. नोव्हेंबरमध्ये पालवी न फुटल्यामुळे काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, गारपीट यासह विविध समस्यांमुळे जिल्ह्यातील काजू पीक धोक्यात आले. गेल्यावर्षी सरासरीच्या ४० टक्के देखील काजू बी उत्पादन आले नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामाकडे सर्व काजू बागायतदारांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु हंगामाची सुरुवात निराशाजनक झाल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी सप्टेंबर अखेरपासून पावसाचा जोर कमी होवून ऑक्टोबर हीट सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून काजू कलमांना पालवी फुटण्यास सुरुवात व्हायची. परंतु यावर्षी ऑक्टोबर संपून नोव्हेंबर उजाडला तरी काजू कलमांना पालवी फुटण्याची चिन्हे दिसत नाही. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम मानला जात आहे.

साधारणपणे पाऊस थांबल्यानंतर कडक उन्हं पडल्यास झाडांना चांगला ताण बसतो. त्यानंतर पालवी फुटण्याची प्रकिया सुरू होते. परंतु यावर्षी २ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे काजू कलमांना अजिबात ताण बसलेला नाही. परिणामी काजू कलमांना पालवी फुटण्याची प्रकियाच सुरू झालेली नाही.

याचा मोठा परिणाम यावर्षीच्या हंगामावर होणार आहे. पालवी वेळेत आली नाही तर मोहोर येणार नाही आणि मोहोर आला नाही तर फळधारणा वेळेत होणार नाही. त्यामुळे यावर्षीचा काजू हंगाम लांबणार हे निश्चित आहे. यावर्षीचा हंगाम फेब्रुवारी अखेर किवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये आतापासून चिंतेचे वातावरण आहे.

काजू कलमांना पालवी फुटलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम आहे. आता पाऊस थांबला असून पुढील आठ ते दहा दिवसांत चांगली पालवी झाडांना फुटेल परंतु त्यावर टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालवी येताच तिच्या संरक्षणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
- प्रा. विवेक कदम, काजू पीक अभ्यासक, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी,
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पालवी येते परंतु यावर्षी अजूनही काजू कलमांना पालवी फुटलेली नाही. याचा मोठा परिणाम हंगामावर होणार आहे. हंगाम लांबणार असून दुसऱ्या टप्प्यातील पीक उत्पादनावर परिणाम होणार आहे.
- मंगेश गुरव, काजू उत्पादक, खांबाळे, ता. वैभववाडी,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

SCROLL FOR NEXT