Cashew Season : पालवी न फुटल्याने काजू हंगाम लांबला; शेतकऱ्यांना मोठा फटका

Cashew Season Farmers : पालवी वेळेत आली नाही तर मोहोर येणार नाही आणि मोहोर आला नाही तर फळधारणा वेळेत होणार नाही. त्यामुळे यावर्षीचा काजू हंगाम लांबणार हे निश्चित आहे.
Cashew Season
Cashew Seasonagrowon
Published on
Updated on

Sindhudurg Cashew Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लांबलेल्या पावसाने काजू पिकावर मोठा परिणाम दिसून येत आहे. अतीपावसाने काजू हंगामावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर सुरू झाला असला तरी अजूनही काजूच्या झाडांना पालवीच फुटलेली नाही. त्यामुळे यावर्षी काजूचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. बागायतदारांची चिंता आतापासूनच वाढली आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील काजू पिकाला बसत आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके, गारपीट यांसह या वातावरणामुळे वाढलेले कीडरोग यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार अक्षरक्षः मेटाकुटीस आला. गेल्या वर्षी सरासरीच्या ४० टक्के देखील काजू बी उत्पादन आले नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामाकडे सर्व काजू बागायतदारांचे लक्ष होते. परंतु, हंगामाची सुरूवात निराशाजनक झाल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी सप्टेंबर अखेरीपासून पावसाचा जोर कमी होऊन ऑक्टोबर हिट सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून काजू कलमांना पालवी फुटण्यास सुरूवात व्हायची. परंतु, यावर्षी ऑक्टोबर संपून नोव्हेंबर उजाडला तरी काजू कलमांना पालवी फुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम मानला जात आहे.

साधारणपणे पाऊस थांबल्यानंतर कडक उन्हं पडल्यास झाडांना चांगला ताण बसतो. त्यानंतर पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु, यावर्षी २ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे काजू कलमांना अजिबात ताण बसलेला नाही. परिणामी काजू कलमांना पालवी फुटण्याची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. याचा मोठा परिणाम यावर्षीच्या हंगामावर होणार आहे.

Cashew Season
Supriya Sule Kolhapur : सिंचन घोटाळा प्रकरण! सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पालवी वेळेत आली नाही तर मोहोर येणार नाही आणि मोहोर आला नाही तर फळधारणा वेळेत होणार नाही. त्यामुळे यावर्षीचा काजू हंगाम लांबणार हे निश्चित आहे. पाऊस जाऊन दोन-तीन दिवस झाल्यामुळे पुढील पाच सहा दिवसांत झाडांना पालवी फुटण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यातील सद्यस्थितीचे वातावरण पाहता टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव देखील वाढण्याचा अंदाज आहे.

काजू कलमांना पालवी फुटलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम आहे. आता पाऊस थांबला असून पुढील आठ ते दहा दिवसांत चांगली पालवी झाडांना फुटेल. परंतु, त्यावर टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालवी येताच तिच्या संरक्षणार्थ विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी घ्यावी. अशी माहिती काजूपीक अभ्यासक प्राध्यापक विवेक कदम यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com