Mulshi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Mulshi Dam : मुळशी धरणाची क्षमता दोन टीएमसीने वाढणार

Mulshi Dam Capacity : मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास धरणात अतिरिक्त दीड ते दोन टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास धरणात अतिरिक्त दीड ते दोन टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. उंची वाढवण्यासाठी भूसंपादन, गावांचे पुनर्वसन यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्याचे आदेश टाटा कंपनीला दिले आहेत. धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पीएमआरडीए क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, असे आदेश पवार यांनी दिले आहेत.

मुळशी धरण हे ब्रिटिशकालीन आहे. हे धरण खासगी मालकीचे असून टाटा कंपनीकडे या धरणाची मालकी आहे. या धरणातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. या धरणाची एकूण क्षमता सुमारे २०.१६ टीएमसी आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात नवीन धरण बांधण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक नाही.

त्यामुळे वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याचा पर्याय पुढे आला आहे. मुळशी धरणाची उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर (Tata Power) कंपनीच्या मालकीची आहे. तर उर्वरित वीस टक्के जमीन शासनाकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी योग्य तो मोबदला दिला जाणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे :

उंची वाढविल्यामुळे किती गावे बाधित होणार, किती जागा जाणार, मूळ शेतकरी किती आहेत. किती घरे बाधित होणार ही सर्व माहिती सर्वेक्षणातून समोर येणार आहे. याद्वारे सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. साधारणपणे जूनमध्ये याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT