ॲग्रो विशेष

Government Scheme : राष्ट्रीय पशुधन अभियानातील योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुखाद्य व वैरण उद्योजकतेमध्ये मुरघास बेल, वैरणीच्या विटावी टीएमआर निर्मितीकरिता दोन टप्प्यांमध्ये सीडबीमार्फत अनुदान उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.

Team Agrowon

बुलडाणा : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध तीन उपअभियानांचा समावेश केला आहे. यात पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उपअभियान, पशुखाद्य व वैरण उपअभियान, नावीन्यपूर्ण योजना व विस्तार उपअभियानाचा समावेश आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजनांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उपअभियानात ग्रामीण कुक्कुटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकासामध्ये कमीत कमी एक हजार अंड्यांवरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राच्या स्थापनेकरिता ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान अधिकतम मर्यादा २५ लाख रुपये प्रति कुक्कुट युनिट आहे. ग्रामीण शेळीपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासामध्ये कमीत कमी १००, २००, ३००, ४०० किंवा ५०० शेळ्या, मेंढ्या गटाची स्थापना करण्याकरिता ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान १०, २०, ३०, ४० व ५० लाख रुपये याप्रमाणे दोन समान हप्त्यांमध्ये अधिकतम मर्यादा ५० लाख रुपये आहे. वराहपालनाद्वारे उद्योजकता विकासामध्ये १०० मादी आणि २५ नर वराह गटाची स्थापना करण्यासाठी उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान २० लाख रुपये आहे.

पशुखाद्य आणि वैरण उपअभियानात गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादनाकरिता अनुदान १०० टक्के मूलभूत बियाणे २५० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, पायाभूत बियाणे १५० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, प्रमाणित बियाणे १०० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान देण्यात येते. पशुखाद्य व वैरण उद्योजकतेमध्ये मुरघास बेल, वैरणीच्या विटावी टीएमआर निर्मितीकरिता दोन टप्प्यांमध्ये सीडबीमार्फत अनुदान उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.

योजनेकरिता प्रकल्प अहवाल, सातबारा, बँकेचा रद्द केलेला धनादेश, बँकेचे संमतिपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, १० टक्के लाभार्थी हिस्सा जमा असल्याचे बँकेचे स्टेटमेंट पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजनेकरिता शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराहपालन क्षेत्र आणि वैरण विकास करून रोजगार निर्मिती आणि उद्योजगता विकासासाठी पशुपालकांनी राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी udymimitra.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एस. पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT