Fisheries Training Agrowon
ॲग्रो विशेष

Cage Fish Farming: पुण्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन कार्यशाळा; मत्स्यव्यवसायात नवे तंत्र!

Pune Fisheries Training: पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर अधिक फायदेशीर होण्यासाठी आणि मत्स्यपालनाच्या शास्त्रोक्त पद्धती शिकण्यासाठी पुण्यात कृषी महाविद्यालयात २५ ते २७ मार्च दरम्यान तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश कोरे

Pune News: ‘पिंजरा मत्स्यसंवर्धन’ हे आधुनिक तंत्रज्ञान असून, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यशेतीसाठी मोठा वाव आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांद्वारे शेतीला पूरक उद्योग निर्माण करावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेचा प्रारंभ मंगळवारी (ता.२५) झाला. यावेळी शिखरे बोलत होते. शिखरे म्हणाले, की पिंजरा मत्स्यशेती किफायतशीर होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते.

तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापनदेखील महत्त्वाचे आहे. कार्यशाळेला मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, वेस्ट कोस्टचे नितीन निकम, वैदिका ॲग्रोचे केतन माने, ध्रुव फिशरीजचे डॉ. सुयोग अहेर तसेच पुणे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत अनुभवी पिंजरासंवर्धक यांच्या वतीने सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या पंतप्रधान मत्स्यसंपदा नीलक्रांतीअंतर्गत योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारकांनी तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीं उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत झपाट्याने वाढतोय पाणीसाठा

Farm Loan Waiver: सांगली जिल्ह्यात ५० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र

Khandesh Rain: खानदेशात तुरळक पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: बुलडाण्यात कर्जमुक्तीसाठी १२,१०७ शेतकरी ठरले पात्र

Khari Jowar Sowing: मराठवाड्यात केवळ ५,९२५ हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी

SCROLL FOR NEXT