Santosh Somvanshi Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Policy: नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या : राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी

Soybean Procurement: राज्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. आजही ४ लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत.

Anil Jadhao 

Latur News: राज्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. आजही ४ लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत. तर खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे. सरकारने एतकर मुदत वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे किंवा या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा, अशी मागणी राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली. \

सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली. मात्र आजही नोंदणी केलेल्या निम्म्या शेतकऱ्यांनाचेही सोयाबीन खरेदी झाले नाही. आजही नोंदणी करून ४ लाख शेतकरी नाफेडच्या संदेशाची वाट पाहत आहेत.

मात्र सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही. बाजारात आजही हमीभावापेक्षा ८०० ते ९०० रुपये कमी भाव मिळत आहे. सरकारला सोयाबीन देण्यासाठी शेतकरी मागील ३ महिन्यांपासून थांबले आहेत. सरकारने या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले नाही तर शेतकरी अडचणीत येतील. 

तसेही सरकारने १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट दिले. खरेदीही सुरु केली. पण प्रत्यक्षात खरेदी झाली नाही. त्यामुळे १५-१५ दिवस बारदाणा मिळाला नाही, शेतकऱ्यांचे सोयाबीन वेळेत खरेदी केले जात नाही, पेमेंट वेळेत मिळत नाही.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया किचकट केली त्यामुळे उद्दीष्ट १४.१३ लाख असतानाही मागच्या १०५ दिवसांमध्ये केवळ ७ लाख ५४ हजार टन खरेदी झाली. म्हणजेच केवळ ५३ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले. आजही ४ लाख शेतकऱ्यांनी सरकारला सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. हे शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत.

सरकारनेच शेतकऱ्यांना हमीभावाचे आश्वासन दिले आहेत. या आश्वासनावर विश्वास ठेऊन ४ लाख शेतकरी वाट पाहत आहेत. सरकारने या शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नये. सरकारने एतकर खरेदीला मुदतवाढ देऊन जोपर्यंत या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होत नाही तोपर्यंत खरेदी सुरु करावी. पण जर सरकारला खरेदी करणे शक्य नसेल तर या शेतकऱ्यांना बाजारभाव आणि हमीभावातील फरक द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असाही इशारा संतोष सोमवंशी यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT