Bullock Cart Race Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Bull : भावाच्या वाढदिवसाला चक्क बैलगाड्याचा ‘गोऱ्हा’ गिफ्ट

वाढदिवसानिमित्त अनेक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याची छायाचित्रेही समाज माध्यमांवर टाकतात.

Team Agrowon

Bullock Cart Race पुणे : वाढदिवसानिमित्त अनेक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याची छायाचित्रेही समाज माध्यमांवर टाकतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात.

परंतु शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवशी चक्क बैलगाड्याचा (Bullock Cart) एक ‘गोऱ्हा’ (Bullock) भेट दिला आहे. त्यामुळे या अनोख्या भेटवस्तूची परिसरात चर्चा आहे.

नानाश्री ग्रुप बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मोठे बंधू युवा सेनेचे जिल्हा संघटक वैभव खेडकर यांनी स्वतःच्या गाडाशौकीन भावाला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून थेट कर्नाटक राज्यातून बैलगाडा शर्यतीचा सुमारे ६० हजार किमतीचा गोऱ्हा आणून भेट देत अनोखे सरप्राइज दिले.

या वेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल खेडकर, आव्हाळवाडीचे प्रसिद्ध गाडा मालक महेंद्र कुटे, वैभव खेडकर, विशाल खेडकर, धनंजय पाचुंदकर, विनायक खेडकर, पांडुरंग खेडकर, दीपक खेडकर आदी मित्र परिवार उपस्थित होता.

आजोबांपासून बैलगाड्याची परंपरा...

विशाल खेडकर हे रांजणगाव गावातील जुने प्रसिद्ध गाडा मालक दगडू खेडकर आणि प्रभाकर खेडकर यांचे नातू आहेत. आपल्या पूर्वजांचा गाड्याचा छंद आजही विशाल हे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासत असून, आजही त्यांच्या गोठ्यात बैलगाडा शर्यतीचे ९ ते १० बैल आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT