Mango Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming Education : बुचकेवाडीला आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा

Organizing an Agricultural School : बुचकेवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी भरत रेवजी जाधव यांच्या बागेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन केले होते.

Team Agrowon

Junnar News : बुचकेवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी भरत रेवजी जाधव यांच्या बागेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन केले होते. कृषी सहाय्यक गणेश धादवड यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंब्याचा मोहर संरक्षण व उत्पादन वाढीसाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली.

कृषी विभाग व प्रधानमंत्री फळ पीकविमा योजनेअंतर्गत शेतीशाळेत सेंद्रिय, जैविक व रासायनिक खते आणि निविष्ठाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रधानमंत्री फळपीक विमा प्रतिनिधी नंदकिशोर खेडकर यांनी आबा पीकविमा योजनेबाबत मार्गदर्शन केले. या वेळी प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेची माहिती पत्रके शेतकऱ्यांना देण्यात आली.

या वेळी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे यांचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

शेती शाळेस वैष्णवधाम-पारुडे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष दगडू पवार, माजी सरपंच सुरेश गायकवाड, प्रगतिशील शेतकरी जितेंद्र पुडे, नंदकिशोर पवार, अजित बुचके, मारुती पवार, बाबू डेरे, दत्तू पवार, सुरेश केदार, आकाश मोदे, विठ्ठल जाधव, शिवाजी डेरे, बबन डेरे, उपसरपंच प्रवीण पवार, मयूर जाधव, गणेश जाधव आदी शेतकरी उपस्थिती होते. भरत जाधव यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT