
Aahilayanagar News : अहिल्यानगर ः जिल्ह्यात यंदा रब्बीसाठीच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पारनेर तालुक्यातून सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातून मात्र यंदा सहभाग कमी आहे. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात काहीसा सहभाग कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शेतीची नैसर्गिक संकटाने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत असल्याने शासनाने २०१६-१७ पासून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जात आहे. खरीप २०२३ पासून राज्यात महाराष्ट्र शासनाकडून १ रुपयात पीकविमा योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून पीकविमा योजनेतही शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या रब्बी हंगामातही प्रधानमंत्री पीक विमा योजनेला गेल्यावर्षीसारखा प्रतिसाद मिळाला आहे. यंदा सहभागाची १५ डिसेंबरची अंतिम तारीख होती. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा २,४७,११७ शेतकरी सहभागी झाले असून या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी मिळून ५ लाख ५५ हजार ८४६ विमा अर्ज केलेले आहेत. यातून ३ लाख ०३ हजार १२० हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पारनेर तालुक्यात २९ हजार ३१५ शेतकरी सहभागी झाले असून श्रीरामपूरला सर्वाधिक कमी १० हजार ८९६ शेतकरी सहभागी झाले आहेत. केंद्र व राज्य सरकार मिळून १४६ कोटी ९५ लाखाचा विमा कंपनीकडे हप्ता भरणार असून १ हजार ९०६ कोटी ९५ लाख ५३ हजार कोटी रुपये विमा संरक्षित झाले आहे. विमा भरणाऱ्यांत महिला शेतकऱ्यांची संख्या केवळ २० टक्के आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षी यंदापेक्षा अधिक सहभाग होता. गेल्या वर्षी २ लाख ९५ हजार ३८९ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी ६ लाख २८ हजार २६१ हजार अर्ज केले होते. त्यातून ३ लाख ६४ हजार २४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. यंदा गतवर्षीपेक्षा ६१ हजार हेक्टर क्षेत्र कमी झाली आहे. गेल्यावर्षी नेवासा, पारनेर, संगमनेर, जामखेडमध्ये सहभाग अधिक होता असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
सहभागी शेतकरी (कंसात विमा घेतलेले हेक्टर क्षेत्र)
अकोले ११,८५४, (१७,०६०)
जामखेड १९,७३५ (२८५८१)
कर्जत १६,४७१, (२१,२१०)
कोपरगाव १३,५१२, (१५,९००)
अहिल्यानगर १३,६७३ (१९,९१७)
नेवासा २४,९७६ (२७,७९५)
पारनेर २९,३१५ (३८,५७०)
पाथर्डी २२,५२४ (२६,४५८)
राहाता १२,६३७ (१५,०८१)
राहुरी २३,०३२ (२३,५८८)
संगमनेर २६,६५० (२९५३७)
शेवगाव ११,३२३ (१३७७२)
श्रीगोंदा ११,९८१ (१३,२१७)
श्रीरामपूर १०,८६९ (१२,४३३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.