Buldana News : समाजातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या अशा एकल जीवन जगणाऱ्या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचा पुनर्विवाह व्हावा, या भावनेतून बुलडाणा येथे आगळावेगळा पुनर्विवाह सोहळा झाला.
यात १० जोडपी विवाहबद्ध झाली. येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. लहाने यांच्या नेतृत्वात मानस फाउंडेशनच्या पुढाकाराने हा सोहळा झाला. विशेष म्हणजे यावेळी १० पैकी चार जोडप्यांचा आंतरजातीय विवाह देखील झाला. समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधत मानस फाउंडेशनने या महिलांच्या पुनर्विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. १० जोडप्याला संसार उपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले.
अशा पद्धतीने आजवर ९० पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले आहेत. तर शंभरावर एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मानस फाउंडेशनची ही चळवळ आता लोक चळवळ बनू पाहत आहे.
या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार धिरज लिंगाडे, शिवसेनेच्या (उबाठा) प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, कर्नल सुहास जतकर, सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, डॉ. इंदुमती लहाने, डॉ. वसंतराव चिंचोले आदी उपस्थित होत्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.