Pune News : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसायवाढीसाठी कॉर्पोरेट अंगाने बळ देणारी ‘सकाळ-ॲग्रोवन’ची दुसरी एकदिवसीय राज्यस्तरीय ‘एफपीसी महापरिषद’ येत्या रविवारी (२९ ऑक्टोबर) होत आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या या महापरिषदेत राज्यभरातील आघाडीच्या निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. फक्त निमंत्रित एफपीसींसाठी होत असलेल्या या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक पारादीप फॉस्फेट लिमिटेड आहेत.
तसेच, एक्स्चेंज पार्टनर म्हणून एनसीडीईएक्स, तर धनश्री क्रॉप सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मल्टिलाइन अॅग्रो इंडस्ट्रीज, स्मार्ट व पीएमएफएमई सहप्रायोजक आहेत. या महापरिषदेमुळे राज्यातील समूह शेतीच्या बळकटीकरणाला चालना, तर कंपन्यांमधील नेतृत्वाला दिशा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, नॅचरल शुगर्स ॲन्ड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांच्यासह समूह शेतीशी संलग्न विविध संस्था व कंपन्यांमधील नामवंत तज्ज्ञ या महापरिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यात सध्या हजारोंच्या संख्येने शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. परंतु उत्पादनापासून ते विपणनापर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या कंपन्यांची संख्या मर्यादित आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’कडून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पहिली ‘एफपीसी लीडरशिप कॉनक्लेव्ह घेण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महापरिषदेतून अनेक कंपन्यांना सकारात्मक प्रेरणा मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.