Banana Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Plantation : केळी रोपांसाठी ‘मल्चिंग पेपर’चा वापर

Mulching Paper Cultivation : दहिगावसह सावखेडा सीम, कोरपावली, महेलखेडी यासह तालुक्यात सध्या टिश्‍यू कल्चरच्या केळी रोपाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : दहिगावसह सावखेडा सीम, कोरपावली, महेलखेडी यासह तालुक्यात सध्या टिश्‍यू कल्चरच्या केळी रोपाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यासाठी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

सध्या केळीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी अनेक पर्याय शोधून काढत आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या केळीसाठी मल्चिंग पेपरचा वापर करुन केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

यासाठी शेतकऱ्यांना एकरी हजारो रुपयाचा खर्च येत आहे. यासाठी मजुरांची संख्या कमी लागत आहे. मल्चिंगच्या वापरामुळे निंदणी, कोळपणीचा खर्च वाचत असून उष्णतेपासून केळी रोपांचे व खोडाचे संरक्षण होत आहे.

शिवाय केळीचे उत्पन्नही चांगले निघत असल्याचा अनुभव बहुतांश शेतकऱ्यांना आलेला आहे. मल्चिंगच्या वापरामुळे एका एकरसाठी साधारणतः दहा ते बारा हजार रुपये खर्च येत आहे. प्रत्येक खोडाला किमान दहा रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एक एकरला मल्चिंग पेपरचे सहा ते सात बंडल लागतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यापासून खोडवा काढायचा असल्यास अगदी कमी खर्च येतो. केळीच्या बागेत स्वच्छता राहते, खतांचा देखील योग्य उपयोग होऊ शकतो. शेतकऱ्यांनी भुईमूग आणि ऊस लागवडीसाठी देखील मल्चिंग पेपरचा वावर करावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT