Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds : अकोला जिल्ह्यात कपाशी बियाण्याचा काळाबाजार

Seed Black Market : अकोला जिल्ह्यात कपाशीच्या काही वाणांना असलेली मागणी पाहता काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू केला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात कपाशीच्या काही वाणांना असलेली मागणी पाहता काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू केला आहे. कपाशी बियाण्याचे पाकीट अव्वाच्या सव्वा दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

असाच प्रकार सुरू असताना अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करीत कृषी विक्रेत्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित विक्रेत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. १२) शहरातील राजस कृषी केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. या केंद्राचा संचालक सुबोधेश्वर शेगोकार एका कंपनीच्या कपाशी वाणाचे बियाणे जादा दराने विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून जिल्हा भरारी पथकाने ही कारवाई केली.

मोहीम अधिकारी महेंद्र सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश दांडगे, पंचायत समिती कृषी अधिकारी रोहिणी मोघाड यांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. ८६४ रुपये किंमत असताना येथे कपाशी बियाण्याचे पाकीट ११०० रुपये दराने विक्री केले जात असल्याचे दिसून आले. यावरून शेगोकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

VIDEO : राज्यभरात कापूस बियाण्याची ऐतिहासिक टंचाई

दुसरी कारवाई

या हंगामात अकोला जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन वाणांचा काळाबाजार फोफावलेला आहे. गेल्या काळात बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. यापूर्वी आडसूळ फाटा येथे एका विक्रेत्याला जादा दराने कपाशी बियाणे विक्री करताना पकडले होते. त्यानंतर आता अकोला शहरात दुसरी कारवाई झाली. येथेही विक्रेता कपाशीचे बियाणे अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत असल्याचे समोर आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought 2026 : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश

Tur Story: तुरीची गोष्ट

Weather Update : ढगांची गर्दी; पावसात नाही जोर!

Rajkesar Mango : हिमायतबागेच्या राजकेसर आंबा वाणाला मान्यता

Global Agri Market: जागतिक शेतीमाल बाजारातील नरमाई तात्पुरती?

SCROLL FOR NEXT