BJP Agrowon
ॲग्रो विशेष

Ahilyanagar Assembly Constituency : अहिल्यानगरला भाजपची जुन्या शिलेदारांवरच मदार

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने या वेळीही जुन्याच आजी, माजी आमदारांना उमेदवारी देऊन विश्वास टाकला आहे. त्यामुळे लढण्याची आणि जिंकत पक्ष मजबूत ठेवण्याची त्यांच्यावर मदार राहणार आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्ह्यात भाजपने या वेळीही जुन्याच आजी, माजी आमदारांना उमेदवारी देऊन विश्वास टाकला आहे. त्यामुळे लढण्याची आणि जिंकत पक्ष मजबूत ठेवण्याची त्यांच्यावर मदार राहणार आहे. बारापैकी पाच जागा भाजपकडे राहून उर्वरित सात जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असतील हे स्पष्ट झाले आहे. मात्र महाविकास आघाडीत कोणत्या जागा कोणाला असतील आणि तेथे उमदेवार कोण असतील याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

भाजपने यंदाचे राजकीय वातावरण पाहून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात शिर्डीतून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत-जामखेडमधून आमदार राम शिंदे, पाथर्डी-शेवगावमधून आमदार मोनिका राजळे, राहुरी-अहिल्यानगरमधून शिवाजी कर्डीले यांनी उमेदवारी दिली. श्रीगोंद्यातून आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना रिंगणात उतरवले आहे.

शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. चारवेळा काँग्रेसकडून, एकदा शिवसेनेकडून व एक वेळा भाजपकडून जिंकलेले असून आता सातव्यांदा भाजपकडून लढत आहेत. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, जामखेडमधून राम शिंदे तिसऱ्यांदा तर राहुरी-अहिल्यानगरचे माजी आमदार व जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले चौथ्यांदा भाजपकडून रिंगणात उतरले आहेत.

आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती बरी नसल्याने पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांनी उमेदवारी जाहीर होऊनही मुलगा विक्रम यांना उमेदवारी द्यावी, अशी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी (ता. २१) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची या बाबत भेट घेतल्याचे सांगितले जात आहेत.

पारनेर, श्रीरामपूरकडे लक्ष

महायुतीतून भाजपकडे पाच जागा गेल्या आणि राहिलेल्या सात जागांपैकी अहिल्यानगर शहर, पारनेर, कोपरगाव व अकोले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तर नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर हे मतदार संघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असतील, असा अंदाज बांधला जात आहे.

प्रामुख्याने श्रीरामपूरची जागेवर शिंदे सेनेकडून उमेदवारांच्या यादीत किसान मोर्चाचे नेते नितीन उदमले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे यांची नावे चर्चेत असली तरी नितीन उदमले यांच्या नावाला भाजप, सेना आणि राष्ट्रवादीकडून संमती असल्याचे कळतेय. खासदार नीलेश लंके यांचा प्रभाव असलेल्या पारनेरमध्ये पत्नी राणी लंके या महाविकास आघाडीकडून लढणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने महायुतीकडून कोण उमेदवार असेल या बाबत गुप्तता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT