Scientist Dr. Anand Ghosalkar Agrowon
ॲग्रो विशेष

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

Team Agrowon

Pune News : पर्यावरणपूरक ‘बायो प्लॅस्टिक’ची निर्मिती आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शक्य बनली आहे. मात्र जगात निर्माण होणाऱ्या एकूण ४०० दशलक्ष टन प्लॅस्टिकच्या तुलनेत याचे प्रमाण केवळ २.१ दशलक्ष टन इतकेच आहे. त्यामुळे बायो प्लॅस्टिकचे उत्पादन कित्येक पटींनी वाढवावे लागणार आहे. हेच आज जगापुढील आव्हान आहे, असे मत ‘बायो प्लॅस्टिक’ विषयातील संशोधक आणि ‘प्राज मॅट्रिक्स संशोधन विकास सेंटर’ मधील मुख्य वैज्ञानिक डॉ. आनंद घोसाळकर यांनी व्यक्त केले.

‘भवताल फाउंडेशन’ आयोजित ‘भवताल टॉक’ या कार्यक्रमात डॉ. घोसाळकर ‘प्लॅस्टिकपासून मुक्ती: वास्तव की मृगजळ?’ या विषयावर बोलत होते. यावेळी भवताल फाउंडेशनचे अभिजित घोरपडे, देवानंद लोंढे, प्राज मॅट्रिक्सचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. घोसाळकर यांनी प्लॅस्टिकचा शोध ते आजपर्यंतची प्रगती असा संपूर्ण पट मांडला. यावेळी ते म्हणाले, की प्लॅस्टिकचा शोध फार पूर्वी लागला असला तरीसुद्धा गेल्या ५० ते ७० वर्षांमध्ये त्याची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळेच आज आपले संपूर्ण जीवन प्लॅस्टिकने व्यापून टाकले आहे. आता तो कचरा तसेच पर्यावरण, आरोग्यावर होणारे परिणाम या स्वरूपात एक मोठी समस्या बनला आहे. मात्र, आताची आपली जीवनशैली पाहता प्लॅस्टिकचा वापर टाळणे हा मार्ग उरलेला नाही. तर त्याला पर्यावरणपूरक पर्याय शोधणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. त्या दृष्टीने ‘बायो प्लॅस्टिक’ विकसित करणे आणि त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवणे आवश्यक आहे.

सध्या वापरात असलेल्या प्लॅस्टिकला ‘बायो प्लॅस्टिक’ चा पर्याय द्यायचा असेल, तर या सर्व टप्प्यांची दखल घेणे आणि तिथे बायो प्लॅस्टिक कसे उपयुक्त ठरेल हे पाहणे गरजेचे आहे. हेही आव्हान आपल्यापुढे आहे. याबाबतचे संशोधन व उत्पादन पुढे नेण्यासाठी प्राज इंडस्ट्रीज सारख्या कंपनी आणि तिचे संस्थापक श्री. प्रमोद चौधरी यांच्यासारखे नेतृत्व प्रयत्नशील आहेच. त्यांच्या प्रयत्नांना सरकार आणि विविध यंत्रणांची सुरुवातीला मदत होणे आवश्यक आहे. असे झाले तर यातून लवकर मार्ग निघू शकेल. असे डॉ. घोसाळकर म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित घोरपडे यांनी केले.

‘पाणी, दुधात प्लॅस्टिकचे अंश धोक्याची घंटा’

घोरपडे म्हणाले, की प्लॅस्टिकचे प्रदूषण सर्वत्र होत आहे. त्याचे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. मायक्रो प्लॅस्टिकचे अंश माणसाच्या शरीरात तसेच जनावरांचे दूध, समुद्रातील मासे यातही आढळल्याचे संशोधनातून पुढे आले आहेत. शेतीतही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर व इतर प्लॅस्टिक गोष्टींच्या वापरामुळे मातीत ते मोठ्या प्रमाणात मिसळत आहे. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘भवताल’च्या वतीने वैज्ञानिक आणि माहितीपूर्ण चर्चा आयोजित करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT