Ethanol production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol production : राज्यातील काही कारखानदारांचा इथेनॉल निर्मितीला विरोध; जैवइंधन शेतकरी संघटनेचा आरोप

Biofuel Farmers Association : राज्यात सध्या उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती केली जात आहे. यामुळे चांगला नफा कारखानदारांना मिळत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. साखर कारखान्यांना बी मोलैसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी ऑगस्ट महिन्यात उठवण्यात आली. तर आता इथेनॉल निर्मितीचा दर सध्या प्रतिलीटर ६५ रुपये ६० पैसे असा मिळत आहे. तरीदेखीर राज्यातील काही कारखानदार इथेनॉल निर्मितीला विरोध करत असल्याचा दावा जैवइंधन शेतकरी संघटनेनं केला आहे.

याबाबत जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी माहिती दिली असून ते म्हणाले की, एफआरपीमधून होणारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी साखर निर्मितीऐवजी थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी सरकारने द्यायला हवी.

यासाठी कार्पोरेट उद्योगांना परवानगी देणे आवश्यक आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी इथेनॉलचा दर प्रतिलीटर केवळ २७ रुपये इतका होता. त्यानंतर २०१४ मध्ये हा दर प्रतिलीटर ४८ ते ४९ रुपये करण्यात आला. २९ जून २०१८ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या ऊस परिषदेत जैवइंधन शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीनुसार केंद्र सरकाने लवकर दरवाढ करावी, अशी मागणी करण्यात आल्याचेही देसाई म्हणाले.

पुढे देसाई म्हणाले, भारतात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत सर्वाधिक ऊस उत्पादन जास्त आहे. इथेनॉलचा सध्याचा दर लक्षात घेता उसाला प्रतिटन ४,५०० ते ५,५०० रुपये दर मिळू शकतो. परंतु महाराष्ट्रातील काही साखर कारखानदारांकडूनच कायमपणे इथेनॉल धोरणाला विरोध होत आहे. खरेतर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती क्षेत्रात कार्पोरेट उद्योगांनी उतरवावे. त्यामुळे उसाला प्रतिटन एफआरपी रुपये ३,००० ऐवजी अधिक मिळू शकतो. इथेनॉल निर्मितीतून प्रतिटन ४,५०० ते ५,५०० रुपये एवढा दर मिळू शकतो. पण इथेनॉल निर्मितीला आपलेच लोक विरोध करत आहेत, जे दुर्दैवी असल्याचेही जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देसाई म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT