Mazi Vasundhara Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Mazi Vasundhara Abhiyan Nashik : माझी वसुंधरा अभियानातून नाशिक जिल्ह्यात मोठी पारितोषिके

Government Scheme : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वावर आधारित अभियान राबवले जाते.

Team Agrowon

Nagar News : माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वावर आधारित अभियान राबवले जाते. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ते एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात आले. या अभियानात जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्या वर्षी भरघोष पुरस्कारांची लयलूट केली.

राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६,४१३ ग्रामपंचायती, अशा एकूण १६,८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला. यात तब्बल ७७५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. पंचतत्त्वावर आधारित स्पर्धेचा निकाल जागतिक पर्यावरण दिली जाहीर करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील मौजे गुंजाळवाडी (ता. संगमनेर) १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला.

सोनईला (ता. नेवासा) १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये भूमी थिमिटिकमधील उच्चतम कामगिरी, अस्तगावला (ता. राहाता) १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये विभागस्तरावर प्रथम, मौजे वाघोली (ता. शेवगांव) २.५ हजार ते ५ हजार लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरावर प्रथम, वाघोलीस (ता. शेवगाव) २.५ हजार ते ५ हजार गटामध्ये भूमी थिमिटिकमधील उच्चत्तम कामगिरी, पेमगिरीस (ता. संगमनेर) २.५ हजार ते ५ हजार गटामध्ये विभागस्तरावर प्रथम, मौजे तिगाव, (ता. संगमनेर) ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गट विभागस्तर प्रथम अशी एकूण ७ ग्रामपंचायतींना ५.५० कोटींची बक्षिसे जाहीर करण्यात आली.

स्थानिक स्वराज्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगर जिल्हा परिषदेचा राज्यात दुसरा क्रमांक आला. मुंबई येथील माझी वसुंधरा सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हस्ते जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान २०२०-२१ मध्ये माझी वसुंधरा अभियान १.०, आणि २०२१-२२ मध्ये माझी वसुंधरा अभियान २.० मध्येही जिल्हा परिषदेने सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे सन्मानित करण्यात आले होते. या अभियानात पुरस्कारांची हॅटट्रिक केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Issue : सोयाबीन खरेदीचा तिढा

Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT