Water Bill Tariff Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bill Tariff : शासनाची २० टक्के पाणीपट्टी दरवाढ न लावण्याचा महासंघाचा निर्णय

Water Bill Hike : शासनाने या वर्षी २० टक्के पाणीपट्टी वाढ केली असली, तरी पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाने ही दरवाढ न लावता जुन्या दराने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी दिली.

Team Agrowon

Buldana News : शासनाने या वर्षी २० टक्के पाणीपट्टी वाढ केली असली, तरी पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाने ही दरवाढ न लावता जुन्या दराने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी दिली.

शासनाने शेतकऱ्यांना २०२३ साली पाणीपट्टी दर १२०० रुपये केला होता. नंतर तो १५८४ झाला व आता १९०० रुपये झाला आहे. एकीकडे शासन झपाट्याने दरवाढ करीत असताना शेतकरी मात्र सध्या प्रचंड अडचणीत आहे.

गत १० वर्षांत शेती मालाला भाव नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन होत नाही.कृषी निविष्ठाचे दर तीन पट वाढलेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी ही दरवाढ सहन करू शकत नाही.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र गाडेकर यांनी महासंघाचे सदस्य शेतकरी यांची उन्हाळी सिंचन नियोजनासाठी बैठक घेतली. या वेळी सर्व शेतकऱ्यांनी दरवाढीस कडाडून विरोध केल्याने गाडेकर यांनी या वर्षीची २० टक्के दरवाढ न लावता मूळ दरानेच पाणीपट्टी आकारणी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

या निर्णयाचे शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. दरवाढ मागे घेण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे, वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याबाबत सुद्धा बैठकीत ठरविण्यात आले. गाडेकर यांचे सुद्धा सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरू असून ते सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकाऱ्यांना सांगून दरवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT