Bhor Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळी तालुक्यांत भोरचा समावेश नाही

Maharashtra Drought : नीरा नदी धरण साखळीतील नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर या चार धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा ८ टक्के पाणीसाठा कमी आहे.

गणेश कोरे

Pune News : नीरा नदी धरण साखळीतील नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर या चार धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा ८ टक्के पाणीसाठा कमी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीसाठा देखील कमी होत आहे. त्यात दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये भोरचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

तालुक्यातील चारही धरणांमधील ४९.१९ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ४४.५७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १ नोव्हेंबरला चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा होता. परंतु या वर्षी वीर धरणात सर्वांत कमी ६१.७३ टक्के पाणीसाठा आहे.

त्याखालोखाल वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणात ९७.५९ टक्के, भोर तालुक्यातील भाटघर धरणात ९९.७१ टक्के, तर नीरा-देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. गुंजवणी, भाटघर आणि नीरा-देवघर धरणांवरील वीजनिर्मिती केंद्रेही बंद आहेत.

शासनाने जिल्ह्यातील नीरा नदी धरण साखळीच्या पाण्यावर अवलंबून असलेले बारामती, पुरंदर, दौड, इंदापूर व शिरूर तालुक्यांचा समावेश गंभीर आणि मध्यम दुष्काळी तालुक्यात केला, मात्र भोरला त्यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

उन्हाळ्यात नीरा-देवघर व भाटघर धरणांमधील पाणी सोडल्यानंतर भोर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे यावर्षी पूर्वेकडील तालुक्यांना दुष्काळाचा निधी मिळेल. त्यामुळे त्यांना फक्त पिण्यासाठीचेच पाणी सोडावे, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नीरा-देवघर, भाटघर व वीर या धरणांमधील पाण्यामुळे पुरंदर बारामती व इंदापूर तालुक्यातील ३७ हजार ७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तर खंडाळा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तालुक्यातील ६५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT