Sugar factory Agrowon
ॲग्रो विशेष

Bhausaheb Thorat Sugar Mill: भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गाळपाची उद्या सांगता

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ५३ हजार मेट्रिक टनांचे उच्चांकी गाळप केले होते.

Team Agrowon

Nagar News : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Cooperative Sugar Factory) या वर्षीच्या या गळीत हंगामाची सांगता व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा उद्या (ता. ३०) सकाळी ९ वाजता आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat), माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (former MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या उपस्थितीत अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी कारखान्यात अनेक वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ५३ हजार मेट्रिक टनांचे उच्चांकी गाळप केले होते. यावेळीही १० लाख टनांपेक्षा अधिक गाळप झाले.

कारखान्यात अनेक वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, ॲड. माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजित थोरात उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT