Natural Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming :राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत भरतपूरमध्ये जनजागृती अभियान

Agriculture Programs : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विषमुक्त अन्ननिर्मिती, जमिनीची सुपिकता या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Team Agrowon

Akola News : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विषमुक्त अन्ननिर्मिती, जमिनीची सुपिकता या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

बाळापूर तालुका कृषी विभाग व भरतपूर ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती जनजागृतीचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच राधा गणेश घोगरे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्माचे तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, विशेषतज्ज्ञ अभिजीत वंजारे, ग्रामविकास अधिकारी एस. एस. जाधव, कृषी सहायक ऋषिकेश गव्हाळे, कृष्णा पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली.

नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल. जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषी शास्त्राला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल.

नैसर्गिक शेतीचे हे फायदे असून रासायनिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती नापिक व कडक पडत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे आणि यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून बाहेर निघण्यासाठी नैसर्गिक शेती आणि विषमुक्त शेती करणे ही आज काळाची गरज आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील विलास घोगरे, गणेश अरविंद घोगरे, जाईबाई शिरसाट, अंजली वानखडे यांची उपस्थिती होती. लक्ष्मण गवई, राजेश खंडारे, खुशाल खंडारे, अनिल खंडारे, अक्षय घोगरे, राजू घोगरे, संजय काळे, मोहन खंडारे, रेखा घोगरे, दत्तात्रय घोगरे, वंदना घोगरे, रंजना घोगरे, कस्तुराबाई घोगरे आदी शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी सहायक कृष्णा पवार यांनी केले. आभार राजूभाऊ घोगरे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT