Fertilizer Stock Update Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Scam : घरपोच खते देण्याच्या नावाखालील फसवणूक टाळा

Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी रासायनिक खते जसे युरिया, डीएपी, फॉस्टेट, पोटॅश, एनपीके १०:२६:२६ ही केंद्र शासनामार्फत अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात.

Team Agrowon

Nashik News : बहुतांशी शेतकऱ्यांचा कल युरिया, डीएपी १०:२६:२६ यांसारख्या ठरावीक खतांच्या मागणीकडे आहे. याचा गैरफायदा घेऊन खासगी व्यक्ती ज्यांच्याकडे खत उत्पादन विक्रीचा कोणताही परवाना नसतो तो शेतकऱ्यांना ज्यादा मागणी असणारी खते घरपोच मिळवून देण्याकरिता आमिष दाखवतो.

त्यामुळे अनधिकृत व्यक्तीकडून घरपोच खते देण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी रासायनिक खते जसे युरिया, डीएपी, फॉस्टेट, पोटॅश, एनपीके १०:२६:२६ ही केंद्र शासनामार्फत अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात. या खताचे उत्पादन हे खत नियंत्रण आदेशानुसार परवानाधारक व्यक्तींनाच करता येते.

या खताचे उत्पादक आणि विक्रेते यांच्यावर राज्य शासनाच्या खत निरीक्षकामार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. कायद्यद्वारे नियुक्त करण्यात आलेले खत निरीक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य गुणवत्तेची खते योग्य दरात उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. केंद्र शासनाकडून पुरवठा होणारी अनुदानित खते ई-पॉज प्रणालीद्वारे उत्पादकांपासून ते वापर करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ऑनलाइन सिस्टीमद्वारे देण्यात येतात.

या सनियंत्रित प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिकृत व योग्य गुणवत्तेची खते पुरवली जातात. त्यामुळे घरपोच व कमी किमतीत खते देणाऱ्या खासगी व्यक्तीकडून खते देताना फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. ही खते अधिकृत सोर्सची नसतात. त्यामुळे अधिकृत उत्पादकाकडून/विक्रेत्याकडून पक्की बिले घेऊन खते खरेदी करावीत.

याबाबत नुकताच हर्सूल (ता.त्र्यंबकेश्वर) येथे १०:२६:२६ या खताच्या बनावट बॅग तयार करून व त्यामध्ये बोगस खते भरून घरपोच उपलब्ध करून देत असल्याची घटना उघडकीस आल्याने हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविलेला आहे.

अशाच प्रकारची विक्री मागील हंगामात पिंपळगाव बसवंत येथे विभागाच्या निदर्शनास आलेली होती. त्यामुळे कोणत्याही अनाधिकृत विनापरवाना धारक व्यक्तीकडून घरपोच खते देण्याच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत विक्रत्यांमार्फतच उपलब्ध होणारी खते ई-पॉजवर नोंदवूनच पक्क्या बिलासह खरेदी करावी व आपली फसवणूक टाळावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT