Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping Training : मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

Tribal Farmer : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले जाईल.

Team Agrowon

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले जाईल. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासीसमूहांसाठी मधुमक्षिका व्यवसाय प्रशिक्षणाबाबत बैठक झाली.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, उपसचिव मच्छिंद्र शेळके, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम निकम, उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की प्रत्येक गावातून प्रशिक्षणासाठी दहा लाभार्थींची निवड केली जाईल. मुक्त विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पाच दिवसांचे उद्योजकता आधारित कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण दिले जाईल.

तसेच प्रत्येक लाभार्थ्याला मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात येईल. मध आणि त्याच्या उपउत्पादनांची बाजारपेठेत प्रचंड मागणी वाढत असल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT