Beed DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Beed Dcc Bank : बीड ‘डीसीसी’ बँकेस ३०० कोटीचे सॉप्टलोन देण्याची मागणी

Cooperative Bank : बँकेच्या शाखांमध्ये आधुनिक भौतिक व तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी १५ कोटी रुपयांची विशेष मदत शासनाने करावी आणि जिल्हा बँकेचे शासनाच्या विविध सवलत योजनेतील बाकी असलेले येणे शासनाने लवकरात लवकर अदा करावे, अशी विनंतीही श्री. मुंडे यांनी केली.

Team Agrowon

Beed News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कृषी व अकृषी कर्जपुरवठा सुरू ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन सवलतीच्या दरात देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध अडचणीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २९) मुंबईत झालेल्या बैठकीस श्री. मुंडे दिल्ली येथून ते व्हीसीद्वारे सहभागी झाले.

बँकेच्या शाखांमध्ये आधुनिक भौतिक व तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी १५ कोटी रुपयांची विशेष मदत शासनाने करावी आणि जिल्हा बँकेचे शासनाच्या विविध सवलत योजनेतील बाकी असलेले येणे शासनाने लवकरात लवकर अदा करावे, अशी विनंतीही श्री. मुंडे यांनी केली.

या सर्वच विषयी अर्थ व नियोजन विभाग, राज्य सहकारी बँक, नाबार्ड यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच सहकार विभागामार्फत बँकेसाठी एक तज्ज्ञ अधिकारी दिला जाईल, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले.

या बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांसह अर्थ व नियोजन विभाग, राज्य सहकारी बँक तसेच नाबार्डचे अधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ आदी उपस्थित होते. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT