Farm Management Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Management : दैनंदिन वाचनातून झालो स्मार्ट...

Team Agrowon

प्रकाश पाटील

Farm Experiment : मी  गोगापूर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील शेतकरी. विविध ठिकाणांहून मिळालेली माहिती आणि इतर शेतकऱ्यांचे अनुभव यांचा उपयोग करून मी माझ्या शेतीत अनेक प्रयोग करीत असतो.

आम्ही तीन भाऊ. मी थोरला असल्याने शेतीसह कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. मी पुण्यात विज्ञान शाखेचे पदवीचे शिक्षण घेत होतो. परंतू कौटुंबिक अडचणींमुळे मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

मधला भाऊ चुणीलाल हे वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवेत व्यस्त झाले. लहान भाऊ मणिलाल यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून तांत्रिक शिक्षण घेतले. शेतीचे व्यवस्थापन हाताळायला १९७६ मध्ये सुरुवात केली. शिक्षण अर्धवट सोडल्याचे शल्य माझ्या मनात होतेच. पण शेती व वडिलांची सेवाही महत्त्वाची होती.


आमची वडिलोपार्जित एकूण ३७ एकर शेती. जमीन काळी, कसदार असल्याने जे पेरलं ते उगवून भरभरून पिकेल, अशी शेती. त्या काळात रासायनिक खतांचा शेतीमध्ये फारसा वापर होत नव्हता. मका, उडीद, मूग, देशी कापूस, ज्वारी ही पिके असायची. रब्बीमध्ये काही क्षेत्रांत हरभरा घ्यायचो. सिंचनासाठी फक्त एकच विहीर असल्याने त्यावर भागत नव्हते.

कुठल्याही एका पिकाचे पूर्ण सिंचन करणे शक्य होत नव्हते. यामुळे कोरडवाहू पीकपद्धतीत सातत्य राखले. हळूहळू बसविला जम शेतीबाबत फारशी तांत्रिक माहिती नव्हती. शिवाय पैशांची अडचणही होतीच. त्यालाच साथ म्हणून १९७२ मधील दुष्काळानेही खूप काही शिकविले. काटकसर महत्त्वाची होती. त्यानुसार पुढे जात राहिलो.

भावांचे शिक्षणही पूर्ण करण्याची जबाबदारी मला पार पाडायची होती. जगण्यापुरते पिकायचे. पुढे शेतीत यांत्रिकीकरण आले. तसे ते आत्मसात करण्यास अनेकांनी सुरुवात केली. सिंचनासाठी विहिरी खोदल्या, कूपनलिका तयार केल्या. पण त्यालाही कमी पाणी लागले. ऊस व इतर पिके पाटपाण्यावर घेणे शक्य होत नव्हते. उपलब्ध पाण्यावर अल्प क्षेत्र भिजायचे.

विहिरीतील उपलब्ध जलसाठ्याचा अंदाज घेऊन कापसाची शेती करायचो. पुढे म्हणजे निसर्गाने भरभरून दिले. त्यावर १९९९ मध्ये १२ एकर शेतीही घेतली. प्रति एकर ८९ हजार रुपये इतक्या दराने जमीन खरेदी केली. सन २००० च्या दरम्यान बंधूही नोकरीत जम बसवून पुढे गेले. त्यांनीही हातभार लावण्यास सुरुवात केल्याने हळूहळू प्रगती होत राहिली.

बदल गरजेचा होता दिवसेंदिवस शेती खर्चीक बनू लागली. त्यामागे अल्प पाऊस, मजुरीचे वाढते दर तसेच बाजारातील खते, बियाण्यातील फसवणूक, शेतीमालाचे कमी दर, कृषी निविष्ठांचे वाढते दर इत्यादी प्रमुख कारणे म्हणता येतील. १९९५ ते २००७ ते ०८ या काळात पाण्याची सोय आणि शेतीचे योग्य ज्ञान, माहिती असणाराच शेतीत तग धरेल, अशी स्थिती तयार झाली.

कारण पाऊस, निसर्ग बेभरवशाचा झाला. हा काळ शेतीत बदलांचा, नावीन्याचा होता. त्यामुळे नवे ज्ञान, माहिती हवी होती. ज्यांच्याकडे शेतीचे नेटके, नेमके ज्ञान, त्याच खर्च कमी होईल व ते शेतीत टिकतील, हा मंत्र घेतला.

नेटक्या माहितीशिवाय शेती करणे खर्चीक, नुकसानीचे ठरत होते. कीडनाशके, संप्रेरके, बियाणे यांच्या नेमक्या माहिती अभावी मोठे नुकसान सहन करावे लागल्याचा अनुभव या काळात आला. त्यातच २००३ मध्ये जलसंकट व इतर कारणांनी मी शेतीमध्ये सूक्ष्मसिंचन आणले. कमाल क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी २२ एकरांत सूक्ष्मसिंचन व्यवस्था केली. त्यामुळे एकाच वेळी संकरित प्रकारच्या कापसाची लागवड करता आली.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT