BBF Technology  Agrowon
ॲग्रो विशेष

BBF Technology : बी.बी.एफ. तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकता वाढवावी

Soybean Cultivation : शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीने (बी.बी.एफ.) व टोकन तंत्रज्ञानाचा मोठ्या क्षेत्रावर अवलंब करून उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

Team Agrowon

Hingoli News : रुंद वरंबा सरी पद्धतीने (बी.बी.एफ.) व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देत. शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीने (बी.बी.एफ.) व टोकन तंत्रज्ञानाचा मोठ्या क्षेत्रावर अवलंब करून उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक मंगळवारी (ता.२२) पार पडली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, की कृषी विभाग व विविध खत कंपनीच्या प्रतिनिधींनी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खत पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याच्या घ्यावी.एचटीबीटी कापूस बियाण्यांची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी पोलिस विभाग, महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे दक्षता घेण्याचे आदेश दिले.

अशा बियाण्यांची विक्री निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड, एक वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या ९४२१४९०२२२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदवाव्यात.

तालुका स्तरावर देखील कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली अशी केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. यावेळी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर युरिया व डीएपी या खतांचा संरक्षित साठा व नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली. शासनाच्या सूचनेप्रमाणे युरिया व डी. ए. पी खतांचा संरक्षित साठा करण्याच्या नियोजनास मान्यता दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Farming: बहुविध भाजीपाला पिकांनी दिली शाश्‍वती

Hi-Tech Nursery Success Story: ‘हायटेक नर्सरी’तून ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श

Chikotra Water Management: काय आहे चिकोत्रा प्रयोग?

Middle East War: युद्ध नको, बुद्ध हवा

Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजनेत आता वराहपालनचा समावेश

SCROLL FOR NEXT