Baramati KVK Agrowon
ॲग्रो विशेष

Baramati KVK: बारामती केव्हीकेचा ‘एनएएएस’कडून सन्मान

NAAS Award: बारामती कृषी विज्ञान केंद्राला (केव्हीके) नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस (एनएएएस) नवी दिल्ली या संस्थेकडून ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके -अटारी झोन ८’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कल्याण पाचांगणे ः सकाळ वृत्तसेवा

Delhi News: बारामती कृषी विज्ञान केंद्राला (केव्हीके) नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस (एनएएएस) नवी दिल्ली या संस्थेकडून ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके -अटारी झोन ८’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी (ता. ६) नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

‘अटारी झोन-८’ अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांचा समावेश आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट-बारामती संचलित केव्हीकेने अनेक वर्षांपासून शेती व शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी योगदान दिले आहे. त्यामध्ये शिक्षण, संशोधनासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले. या कार्याची दखल ‘एनएएएस’ने घेतली.

त्यानुसार बारामती केव्हीकेला नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर) येथे ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके -अटारी झोन ८’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘एनएएएस’चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक, उपाध्यक्ष डॉ. बी. एस. धिल्लन, धानुका ग्रुपचे चेअरमन श्री.

अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते बारामती केव्हीकेचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. ‘एनएएएस’ ही संस्था संपूर्ण देशातील कृषी व कृषी निगडित क्षेत्रातील होणाऱ्या संशोधनाचे मूल्यमापन मागील ३० वर्षांपासून करत आहे. तसेच ही संस्था भारतातील प्रकाशित होणाऱ्या सर्व संशोधन पत्रिका (रिसर्च पेपर जर्नल) यांचे मूल्यांकनही करते.

दरम्यान, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी पुरस्कार विजेते केव्हीकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या वेळी राजेंद्र पवार म्हणाले, की बारामती केव्हीकेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत आहेत.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि केव्हीके यांच्या कार्यामुळे आजचा युवा वर्ग कृषी क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. याचा मनस्वी आनंद होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT